Type Here to Get Search Results !

पोलादपूर तालुक्यातील महालगुर येथे सर्पदंशाने एका मुलीचा मृत्यू


पोलादपूर तालुक्यातील महालगुर येथे सर्पदंशाने एका मुलीचा मृत्यू 


रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर


 . पोलादपूर तालुक्यातील महालगुर मोरेवाडी येथे सर्पदंशाने धनिष्का रुपेश मोरे यांचा मृत्यू झाला आहे.
                     शाळेला सुट्टी असल्याने कुमारी धनिष्का रुपेश मोरे वय (१०) वर्ष ही तिच्या आजोबांकडे मोरेवाडी येथे आली होती. 
                   शुक्रवार दिनांक 20 मे रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तिला झोपडीमध्ये तिच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला विषारी मन्यार जातीच्या सर्प दंश केल्याने तिला उपचाराकरिता प्राथमिक ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे घेऊन आले असताना तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर औषधउपचार सुरू करून तिला अधिक उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय तालुका महाड येथे दाखल केले असता तिला उपजिल्हा रुग्णालय तालुका महाड येथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले म्हणून म. रजि. ११/२०२२ दाखल करून पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशांवर फौजदार भिंडे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test