Type Here to Get Search Results !

मुंबई गोवा महामार्गावर स्कॉर्पिओची टेम्पोला जोरदार धडकस्कॉर्पिओ मधील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू तर चार जण गंभीर जखमी


मुंबई गोवा महामार्गावर स्कॉर्पिओची टेम्पोला जोरदार धडक

स्कॉर्पिओ मधील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू तर चार जण गंभीर जखमी


रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


 मुंबई गोवा महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे वाहनांची वर्दळ वाढली आहे. यावेळी महामार्गाचे अनेक अपूर्ण असलेले चौपदरीकरणाचे काम यामुळे मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असतानाच याच मार्गावर अपघाताची मालिकाही काही दिवसांपासून सातत्याने सुरु असलेल्या चित्र आहे. याचदरम्यान नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर मौजे निडी गावाच्या हद्दीत निडी पुलाजवळ मुंबई बाजूकडून महाड बाजूकडे जाणार्या स्कॉर्पिओ गाडीने महामार्गालगत उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून टेम्पो चालकासह स्कॉर्पिओ मधून प्रवास करणारे असे चार जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. दैव बलवत्तर म्हणून स्कॉर्पिओ गाडी मधून प्रवास करणारे चार लहान मुले बालंबल बचावले आहेत.

 या अपघाता संदर्भात नागोठणे पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार गुरुवार दि. १९ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर मौजे निडी गावाच्या हद्दीत निडी पुलाजवळ मुंबई बाजूकडून महाड बाजूकडे जाणार्या लेनवर रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या गणपतींच्या मुर्तीनी भरलेल्या आयशर टेम्पोला( क्र. एमएच ०६ /बीडब्लु १४१४) स्कॉर्पिओ गाडी ( क्र. जीजे ०१/एचडब्लु १८११) यातील चालाक यग्नेश दिलीपभाई पटेल (वय ३३ वर्षे) रा. अहमदाबाद, गुजरात याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.या अपघाताची माहिती मिळताच नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्यासह पो.ह. एस.पी. कारभारी, पो.ना. एन व्ही पाटील, पो.शि. ए व्ही पाटील व पो.शि. आर एम ठाकुर यांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेतली. या अपघातात स्कॉर्पिओ गाडी आयशर टेम्पोच्या मागील बाजूस उजव्या चाकाला जोरदार धडकल्याने स्कॉर्पिओचा पुढील भाग चेपला जाऊन प्रवाशी गाडीमध्ये अडकले होते. यावेळी स्कॉर्पिओ चालकासह स्कॉर्पिओ मध्ये अडकलेले प्रवासी कार्तिक पंकजभाई पटेल (वय २८वर्षे), मानसी कार्तिक पटेल (वय २८वर्षे), फोरम यग्नेश पटेल ( वय ३४ वर्षे) सर्व रा. अहमदाबाद, गुजरात यांना उपस्थित स्थानिकांनी गाडीतून बाहेर काढून त्यास लहान मोठ्या स्वरूपाच्या दुखापत होत जखमी झाल्याने तसेच यावेळी टेम्पो तपासणी करण्याकरिता खाली उतरलेला टेम्पो चालक राकेश लक्ष्मण पाटील रा. ईरवाडी, पेण हा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यालासुद्धा नागोठणे पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने प्रथमोपचारासाठी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. याठिकाणी सर्व जखमींवर उपचार करून या सर्व जखमींना पुढील उपचारासाठी पेण व पनवेल येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. 
तर या अपघातात स्कॉर्पिओ मधील जित यग्नेश पटेल (वय ०१ वर्ष), धेय यग्नेश पटेल (वय ०४ वर्ष), शिवाय कार्तिक पटेल (वय ५ वर्ष) व न्यासा कार्तिक पटेल (वय ४ वर्ष) यास या अपघातात किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांनाही पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान स्कॉर्पिओ मधील जखमी प्रवासी कार्तिक पंकजभाई पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे नागोठणे पोलिसांनी सांगितले. या अपघाताची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. स्कॉर्पिओ चालक यग्नेश पटेल याच्या विरोधात भा.द.वि. कलम २७९, ३३७, ३३८ व मो.वा. का. १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आली असून पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. एस.पी. कारभारी हे अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test