Type Here to Get Search Results !

MGM हॉस्पिटल वाशी येथे अंतिम बिलामध्ये रुग्णांना 15 % टक्के सूट.मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश.


MGM हॉस्पिटल वाशी येथे अंतिम बिलामध्ये रुग्णांना 15 % टक्के सूट.

मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश.


रायगड वेध विठ्ठल ममताबादे उरण


गरिबांना दिवसेंदिवस जगणे कठीण झाले आहे. महागाईने तर सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे.अशातच गोरगरीब व गरजू रुग्णांकरिता अंतिम बिलात सवलत मिळावी यासाठी मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश आले असून प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल पाटेकर यांनी केलेल्या पत्रव्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद देत MGM हॉस्पिटल वाशी नवी मुंबई उरण मधील गरीब व गरजू लोकांसाठी अंतिम बिलात 15% सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

अंतिम बिलात 15% सूट देण्यात येईल असे अधिकृत पत्र विशाल पाटेकर यांना प्राप्त झाले असून याचा फायदा समाजातील दुर्बल घटका पर्यंत पोहोचणार आहे. मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण या संस्थेने केलेल्या पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाल्याने उरण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेश बालदी यांनी मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान च्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test