जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा?
०१) मेष राशी
पैसे देताना सावधानता बाळगा. प्रलंबित काम पूर्ण होईल, धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आयुष्य आनंदी असेल.
शुभ रंग - निळा
०२) वृषभ राशी
एखाद्या कामाचे पैसे बऱ्याच दिवसांनंतर आता मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाचा योग निर्माण होईल. कामात प्रगती होईल. तब्येतीची काळजी घ्या.
शुभ रंग - पांढरा.
०३) मिथुन राशी
आरोग्य निरोगी राहील. मित्र-मैत्रीणींची भेट होईल. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. मनात संयम ठेवा.
शुभ रंग - पिवळा
०४) कर्क राशी
या आठवड्यात नेतृत्वाची संधी मिळेल. नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या वागतील. वाद टाळून सर्वांना एकत्र करुन कामं करुन घ्यावी लागतील. डोकं थंड ठेवून नियोजन करणे हिताचे.
शुभ रंग - निळा.
०५) सिंह राशी
प्रगती होईल. धनलाभाचा योग आहे. अडचणी दूर होतील. हुशारीने वागाल तर प्रगतीची घोडदौड सुरू होईल.
शुभ रंगः लाल.
०६) कन्या राशी
तब्येतीची काळजी घेणे आणि नियोजन करुन काम करणे हिताचे. या आठवड्यात परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. वाद टाळावे लागतील. काही खर्च टाळणे जमणार नाही.
शुभ रंग - नारंगी.
०७) तूळ राशी
सावध राहाल आणि हुशारीने वागाल तर प्रगती कराल.
गोड बोलाल तर कामं लवकर पूर्ण होतील. प्रवासाचा आणि मिष्टान्नाचा योग आहे. तब्येत सांभाळा. नियोजन हिताचे.
शुभ रंगः निळा.
०८) वृश्चिक राशी
प्रयत्नांती परमेश्वर लाभेल. छोट्या अपयशाने खचू नका. नियोजनात चूक होणार नाही याची काळजी घ्या.
नियोजन हिताचे. तब्येतीची काळजी घ्या. घरच्यांना वेय़ळ द्या. वेळेचे नियोजन हिताचे.
शुभ रंग - पिवळा.
०९) धनु राशी
मन स्थिर ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. घरातल्यांसोबत या आठवड्यात काही सुखाचे क्षण लाभतील. नियोजन हिताचे.
शुभ रंग - लाल.
१०) मकर राशी
तब्येत सांभाळा. आर्थिक नियोजन करणे आणि जवळच्यांचे मन राखणे हिताचे. घरासाठी वेळ द्या. प्रगती होईल.
रंग शुभ - पिवळा.
११) कुंभ राशी
घरच्यांची काळजी घ्या. पैसे जपून वापरणे हिताचे. गोड बोलाल तर प्रगती कराल. तज्ज्ञांचा सल्ला फायद्याचा ठरेल.
शुभ रंग - पांढरा
१२) मीन राशी
आठवड्यात तब्येत सांभाळा. वाद टाळा. घरासाठी वेळ काढणे हिताचे. आर्थिक नियोजन लाभाचे.
शुभ रंगः नारंगी.