विद्यार्थ्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहेत - नामदार आदित्य ठाकरे
रायगड वेध गिरीश गोरेगावकर माणगाव
सध्या विद्यार्थ्यांपुढे अनेक आव्हाने आहेत. विद्यार्थ्यांनो तुम्ही जी जी स्वप्ने पाहता य ती पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वाल राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री ना . आदित्य ठाकरे यांनी लोणेरे येथे व्यक्त केला.
लोणेरे येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर तंत्र शास्त्र विद्यापिठातील इन्क्यू बेशन सेंटर पदव्युतर संशोधन केंद्र आणि अनु जाती जमाती मुलींचे वसतीगृह इमारत भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास आदित्य ठाकरे, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार योगेश कदम, आमदार अनिकेत तटकरे, कुलगुरू डॉ. काळे, तंत्र शास्त्र शिक्षण संचनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ, विनायक निपूण जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. आदित्य ठाकरे यांनी कॉलेजमध्ये राजकारण येवू नये पण चांगल्यासाठी राजकारण चालू शकते . वसतीगृहाची सुधारणा करणे गरजेचे आहे . युवा वर्गाला पुढे न्यायचे असेल तर त्यांना चांगले शिक्षण , तंत्रशिक्षण आरोग्य सुविधा दिल्या पाहिजेत .केजी टू पीजी या पिढीला आपण काय देतो यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे .आपला अभ्यासक्रम आजही फार जूना आहे . आजच्या युवा वर्गाला विचारणाची संधी आणि विचार करण्याची संधी देण्याची ताकद या विदयार्थ्यांमध्ये देण्याची गरज असल्याचे सांगितले . ते म्हणाले की ,पायाभूत सुविधांसोबत ग्रामीण भागातील शाळांमध्ये मैदाने, अत्यानुधिक प्रयोगशाळा, चांगल वॉशरूम, वसतीगृह देण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. आज देशाची एक बाजू खूप श्रीमंत होतेय तर ए क बाजू अत्यंत गरीब होतेय ही दरी आपण मिटवू शकलो तरच आपण इंडिया २० चा विचार करू शकतो यासाठी शाश्वत विकासावर लक्ष केंद्रीत करायला पाहिजे असे ते म्हणाले .
उदय सामंत यांनी कुलगुरू विदयापिठ परिसरात रहाणे बंधनकारक केले म्हणून मी दोषी ठरलो . चांगले शिक्षण त्यासोबत क्रीडा संकुल आणि फीबावत योग्य ता विचार सरकारचा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले .
पालकमंत्री आदिती तटकरे यांनी औषध निर्माण संशोधन केंद्र अर्थात नायपरचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवावा आणि त्याचा पाठपुरावा करावा. तसेच वसतीगृहची देखभाल दुरुस्ती सार्या तरतूद करावी, असे सांगितले
खासदार सुनील तटकरे यांनी मी पालकमंत्री असताना या विद्यापीठासाठी जास्तीत जास्त निधी आणल्याचे सांगून या विद्यापिठाासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे सांगितले . या सरकारच्या माध्यमातून तंत्र शिक्षण दर्जेदार करू शकू हा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला .