Type Here to Get Search Results !

नागोठणे पोलिसांची गावठी दारुविरोधी मोहिम सुरूच, उनाठवाडी जंगलातील दोन हातभट्ट्या उध्वस्त


• नागोठणे पोलिसांची गावठी दारु विरोधी मोहीम सुरूच, उनाठवाडी जंगलातील दोन हातभट्ट्या उध्वस्त 

• आठ हजार रूपयांचा मुद्देमाल केला नष्ट 


रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दितील चेराठी, काळकाई, वाघ्रणवाडी लगतच्या जंगल परिसरातील सुरु असलेल्या गावठी दारूच्या अनेक हातभट्ट्या नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिसांच्या पथकाने काही दिवसांपूर्वीच उध्वस्त केल्या आहेत. गावठी दारु विरोधी मोहिमेचाच एक भाग म्हणून पो.नि. तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस ठाणे अंमलदार व पथकाने नागोठणे पोलिस ठाणे हद्दीतील उनाठावाडीच्या दक्षिण जंगल परिसरात आज सकाळी धाड टाकली. यावेळी गावठी दारूच्या दोन हातभट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. 

नागोठणे पोलिसांच्या या धाडीत चार प्लास्टिकचे ड्रम मधील रु. ४० प्रति लिटर दराचे व एकुण रु. ८ हजार किंमतीचे २०० लिटर गुळमिश्रित रसायन तसेच दारू गाळण्याची दोन भांडी असा मुद्देमाल मिळून आला. हा मुद्देमाल वाहतुकीस अवजड व अवघड असल्याने सदरचा मुद्देमाल हा जागीच नष्ट करून पेटवून देण्यात आला आहे. नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. परेश मोरे, पो.ना. सचिन भोईर,पो.ना. जयेंद्र पाटील, पो.ना. मिथून मातेरे, पो.ना. गंगाराम ढूमणे, पो.शि. आशिष पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

दरम्यान नागोठणे पोलिसांनी सुरु केलेल्या गावठी दारु विरोधी मोहिमेचे संपूर्ण नागोठणे विभागातील जनतेकडून स्वागत करण्यात येत असून पोलिसांनी या गावठी दारु माफियांचा कायमचा बंदोबस्त व नायनाट करुन गावठी दारुला नागोठणे विभागातून हद्दपार करुन त्रस्त झलेल्या महिला वर्गाचे आशीर्वाद मिळवावेत अशी मागणीही नगरिकांतून होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test