Type Here to Get Search Results !

अवकाळी पावसात मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था


अवकाळी पावसात मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था


 रायगड वेध ऋषाली राजू पवार पोलादपूर


                पोलादपूर तालुक्यात शनिवार दिनांक 23 एप्रिल रोजी सायंकाळी वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाला होता. मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ गेले तीन वर्ष काम चालू आहे त्यामुळे मुख्य रस्ता भुयारी करण करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग काढण्यात आला परंतु पर्यायी मार्ग खूपच कमी रुंदीचा असल्याने एकावेळी दोन अवजड वाहने निघू शकत नाही त्यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. सुमारे दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असतात दिवसभरात हे दृश्य वारंवार दिसते.
           अवकाळी पाऊस पडल्यामुळे पाणी मार्गावरच अडकून राहिले होते पाणी अडवून राहण्याचे कारण म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाल्याचे झालेले नाल्याचे अर्धवट काम पाणी तुंबल्याने रस्त्याची दुरवस्था इतकी झाली की एका बाजूने सुमारे २०० मीटर मार्ग वाहनांसाठी बंद करावा लागला.
         वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडी तसेच रस्त्याची दुरावस्था वाहतूक कोंडीचे नियंत्रण करणे वाहतूक पोलिसांना कठीण होत आहे. तसेच रोड लगत असणाऱ्या हॉटेल लहान मोठी दुकाने यांनाही हा त्रास सहन करावा लागत आहे तसेच वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. वाहनचालकांना मार्गाचा अंदाजा न आल्याने लहान-मोठे अपघात देखील घडत होत आहेत
            
      ‌ ‌

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test