Type Here to Get Search Results !

• शाळापूर्व तयारी उपक्रमांतर्गत मुलांचे औक्षण करत केले शाळेत दाखल


• शाळापूर्व तयारी उपक्रमांतर्गत मुलांचे औक्षण करत केले शाळेत दाखल

रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


रोहा तालुक्यातील नागोठणे जवळील ऐनघर ग्रामपंचायतीमधील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळापूर्व तयारी उपक्रमांतर्गत प्राथमिक शाळा कानसई येथे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षी दाखल होणाऱ्या मुलांचे औक्षण करत शाळेत दाखल करून घेण्यात आले.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या काळात शाळा पुर्णतः बंद होत्या. काही काळानंतर शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आल्या होत्या. यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये अनेक ठिकाणी शाळा तसेच महाविद्यालयीन वर्ग पूर्ववत सुरू झाले मात्र याचवेळी अंगणवाडी प्रवेश येथील शिक्षण अद्यापही सुरू झालेले नाही.सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत नव्याने दाखल होणारी मुले हे अंगणवाडी मध्ये गेलेली नाहीत. त्यामुळे या मुलांना शाळेविषयी काहीही माहिती नाही. ते आता सरळ शाळेत इयत्ता पहिली मध्ये दाखल होणार आहेत.
  त्यामुळे प्राथमिक शाळा कानसई येथील मुख्याध्यापक बाळासाहेब चिंचोले यांनी पुढाकार घेऊन शाळा पूर्व तयारी उपक्रमांतर्गत या मुलांना शाळा आपलीशी वाटली पाहिजे व शाळेबद्दल त्यांच्या मनात भीती राहू नये म्हणून या वर्षी जून ऐवजी एप्रिल मध्येच या नवीन मुलांना शाळा पूर्वतयारी व्हावी म्हणून प्रभातफेरी कडून त्यांचे औक्षण करून शाळेत दाखल करून घेतले. यावेळी ही मुले नवीन पाहुणे असल्याने त्यांचे गुलाब पुष्प व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमात निवास पवार, सुमित काते, दिलीप हारपाल यांनी मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तर अमित काते यांनी कार्यक्रमात सर्वांना नाश्ता दिला.
   रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा कानसई येथे संपन्न झालेला या कार्यक्रमाला स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील हारपाल, महेंद्र ढाणे, अजित ढाणे, अंगणवाडी सेविका मानसी ढाणे, शालिनी हारपाल, ऐनघर ग्रामपंचायत सदस्या प्रज्वली भोईर मुख्याध्यापक बाळासाहेब चिंचोले व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test