अखेर संगणक परिचालकांच्या ठिय्या आंदोलना पुढे सीएससी कंपनीचे प्रशासन झुकले...
● मानधना बाबत इन्व्हाईस क्लेम साठी लावलेली जाचक अट केली रद्द
● रायगड मधील आंदोलनाचा महाराष्ट्रातील सुमारे २२ हजार संगणक परिचालकांना फायदा
● संघटनेचे राज्यसचिव तथा रायगड जिल्हा अध्यक्ष मयूर कांबळे यांचेवर पूर्ण महाराष्ट्रातून कौतुकाची थाप
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
संगणक परिचालक संघटनेच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रा मध्ये काम करणाऱ्या संगणक परिचालकांनी बुधवार दि.१३ एप्रिल २०२२ रोजी इन्व्हाईस क्लेम ला लावण्यात आलेली अट रद्द करण्यात यावी या मागणीसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेउन रायगड जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.भालेराव साहेब यांनी संघटनेच्या शिष्टमंडळा सोबत चर्चा करून संघटनेची भूमिका जाणून घेऊन जिल्हा व्यवस्थापक आणि प्रकल्प व्यवस्थापक यांचे सोबत चर्चा केले नंतर इन्व्हाईस क्लेम ला लावण्यात आलेली अट रद्द करण्याबाबत सीएससी कंपनी प्रशासनाला कळविले होते त्यावर संघटने कडून जो पर्यंत ती अट काढत नाहीत तो पर्यंत आम्ही जागेवरून उठणार नाही आणि कंपनीला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो दुपारी २ वाजेपर्यंत घ्यावा अशी ठाम भूमिका घेऊन आंदोलन सुरू ठेवले होते.
आंदोलनात सामील झालेल्या सुमारे शेकडो महिला भर उन्हात ठाम बसल्या होत्या काहींची लहान मुले देखील सोबत होती असे असताना कंपनी कडून कोणतीही हालचाल होत नसल्याने संघटनेचे राज्यसचिव तथा रायगड जिल्हाध्यक्ष मयूर कांबळे यांनी आक्रमक भूमिका घेऊन आता जर कंपनी काही निर्णय घेत नसेल तर या ठिकाणी चालू असलेल्या आंदोलनाला वेगळे वळण लागू शकते असा धमकी वजा सूचक इशारा दिल्या नंतर हालचालींना वेग येऊन दुपारी दोन वाजायच्या सुमारास उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुन्हा एकदा संघटनेच्या शिष्टमंडळाला चर्चेला बोलावून प्रोजेक्ट मॅनेजर कडून लेखी पत्र देत असल्याचे सांगितले आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती केली असता जिल्हा कार्यकारणी ला विचारात घेऊन आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे शब्दाचा मान ठेऊन ठिय्या आंदोलन मागे घेत असल्याचे जिल्हाध्यक्ष मयूर कांबळे यांनी घोषित केले असून सी.एस.सी. कंपनी प्रशासनाकडून दिलेल्या लेखी पत्रानुसार संध्याकाळी ७ चे दरम्यान मानधना बाबत इन्व्हाईस क्लेम साठी लावलेली जाचक अट रद्द करण्यात आली असल्याचे मयूर कांबळे यांनी सांगितले.
यावेळी ठिय्या आंदोलनात जिल्ह्यातील महाड, माणगाव, पोलादपूर, तळा, म्हसळा, रोहा, मुरुड, अलिबाग, पेण, कर्जत, उरण, सुधागड-पाली या तालुक्यातील संगणक परिचालक सहभागी झाले होते.
----------
● कंपनीला झुकावेच लागले ...
इन्व्हाईस क्लेम साठी लावलेली जाचक अट सीएससी कंपनीने रद्द करावी अन्यथा जिल्हा परिषदेच्या आवारात आंदोलन करण्यात येईल असे निवेदन दिलेले असताना सीएससी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर समशेर खान यांनी सोशिअल मीडियावर पुष्पा सिनेमातील "मै झुकेगा नही साला".. हे डायलॉग टाकून संगणक परीचालकांच्या जखमेवर मीठ चोळून डिवचविण्याचा प्रयत्न केला होता, प्रोजेक्ट मॅनेजर यांचे डायलॉग बाजीचा चांगलाच समाचार घेऊन जशास तसे उत्तर देऊन आंदोलन करण्यात आले आणि या तीव्र स्वरूपाच्या ठिय्या आंदोलनाची दखल घेत कंपनीने इन्व्हाईस क्लेम साठी लावलेली जाचक अट रद्द करीत असल्याचे लेखी पत्र संघटनेला दिले आणि अखेर संगणक परीचालकांचे आंदोलनापुढे झुकावे लागले आहे अशी चर्चा जिल्हाभर सुरू आहे.
या आंदोलनाचा रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सुमारे २२ हजार संगणक परिचालकांना फायदा झाला असून संपूर्ण महाराष्ट्रामधून संघटनेचे राज्यसचिव तथा रायगड जिल्हा अध्यक्ष मयूर कांबळे यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
संगणक परिचालकांच्या हक्काच्या मानधनाबाबत सी.एस.सी.कंपनी प्रशासनाकडून इन्व्हाईस क्लेम ही अट लावली होती त्याबद्दल रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून नाराजी होती त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले आणि त्याला यश मिळाले असून संगणक परिचालकांच्या एकजुटीचा हा विजय आहे. सी.एस.सी.कंपनी संगणक परिचालकांवर वारंवार अन्याय करत असून या कंपनीने महाराष्ट्रात खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे. संघटना लवकरच याचा पर्दाफाश करेल आणि या पुढे पुन्हा जर अशी कोणती अट लावली तर संगणक परिचालक कंपनीच्या मुंबई, पुणे येथील कार्यालयामध्ये घुसून तोड फोड आंदोलन करतील.
श्री.मयूर गणेश कांबळे
राज्यसचिव तथा रायगड जिल्हाध्यक्ष संगणक परिचालक संघटना