• गावाच्या सर्वांगीण विकासात महिलांचेही योगदान महत्त्वाचे असते - पालकमंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन
● ठाकरोली ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
म्हसळा तालुक्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग सुरू झाली असून शिवसेना, भाजप पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार सुनिल तटकरे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांचे विकास कामांवर प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत.
दि.१० एप्रिल २०२२ रोजी म्हसळा तालुक्यातील ठाकरोली गावचे ग्रामस्थ, महिला, तरुण मंडळी यांनी राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांचे उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेऊन राष्ट्रवादीच्या विकास रथात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाकरोली येथे साकव बांधणे या कामाचे भूमिपूजन व ठाकरोली ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश कार्यक्रमास संबोधित करताना राज्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी आदिती तटकरे यांनी सांगितले की गावाचा विकास हा गावातील सर्व नागरिकांच्या एकीने होत असतो, पुरुष मंडळींच्या बरोबरीने आजच्या घडीला महिला देखील गावाच्या प्रगतीकडे व विकासात्मक कामे होण्यासाठी प्रयत्नशील असतात म्हणूनच गावाचे सर्वांगीण विकासात महिलांचे देखील योगदान महत्त्वाचे असते असे पालकमंत्री यांनी सांगून जी जी गावे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही असे आश्वाशीत करून सर्व समाजातील महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे असे सांगून महिलांना सभागृह, महिला कार्यशाळा उपलब्ध करुन देऊन बचत गटांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यावर भर दिला जाईल असे सांगितले. मुंबईकर मंडळीने गावाला फक्त सण उत्सव साजरे करण्याकरिता न येता या सर्व मंडळीनेसुद्धा आपल्या गावाच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे असा सल्ला दिला. तसेच ३५/४० वर्ष ज्या पक्षात विश्वास ठेवून राहिलात त्या पक्षाचे माध्यमातून विकास कामे झाली नाहीत त्या विकास कामांचा बॅकलॉग येणारे काही महिन्यातच भरून काढू असे ग्रामस्थांना आश्वासन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना गाव अध्यक्ष विनायक खेरटकर यांनी सांगितले की आमच्या ठाकरोली गावाचा विकास अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. आजूबाजूच्या गावांचा विकास खासदार सुनिल तटकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माध्यमातून होत आहे हे आम्हाला आता समजले आहे त्यामुळे तटकरे कुटुंबियांचे गावागावात विकास कामे करण्याची पद्धत पाहून आम्ही ठाकरोली गावचे ग्रामस्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहोत असे सांगितले. यावेळी सर्व पक्ष प्रवेश कर्त्यांचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले.
यावेळी आयोजित कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बबन मनवे, तालुका समन्वय समिती अध्यक्ष नाझीम हसवारे, तालुका अध्यक्ष समीर बनकर, मुंबई कमिटी अध्यक्ष महेश शिर्के, तालुका महिला अध्यक्षा रेशमा कानसे, माजी सभापती छायाताई म्हात्रे, माजी उपसभापती मधुकर गायकर, माजी उपसभापती संदिप चाचले, जेष्ठ नेते रियाझ फकी, वरवठणे गण अध्यक्ष सतिश शिगवण, पाभरे गण अध्यक्ष अनिल बसवत, आंबेत गण अध्यक्ष संतोष सावंत, प्रकाश गाणेकर, ठाकरोली सरपंच स्नेहा सोलकर, गाव अध्यक्ष विनायक खेरटकर, मुंबई मंडळ अध्यक्ष, सचिव, खजिनदार व अन्य पदाधिकारी, पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गाव अध्यक्ष, महिला व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.