राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ह्दयविकाराचा झटका, रूग्णालयात दाखल
टिम रायगड वेध
राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ह्दयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांना ह्रदय विकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
धनंजय मुंडे यांना अचानक किरकोळ त्रास जाणवू लागला. त्यानंतर मुंडेंना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं. धनंजय मुंडेना उपचारासाठी ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल केल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील रूग्णालयात पोहोचले.
दरम्यान, काळजी करण्याचे काही कारण नसून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. तर कामाच्या तणावामुळे धनंजय मुंडे यांना अचानक त्रास झाला असू शकतो, अशी शक्यता राजेश टोपेंनी व्यक्त केली आहे