श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर
३ एप्रिल रविवार रोजी अनेक ठिकाणी श्रद्धा पूर्ण भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात आला.
कशेडी घाटातील प्रसिद्ध स्वामी समर्थ मठ या ठिकाणी अनेक भाविक खूप लांबून दर्शन घेण्यासाठी आले होते. गेले दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सोहळा खूप कमी लोकांच्या उपस्थितीत संपन्न होत होता परंतु कोरोना नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता मिळाल्याने भाविक मोठ्या संख्येने शहरातून गावागावातून या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा साठी येणाऱ्या भाविकांची ही चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आले होते. जसे की भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती राहण्याची सोय देखील करण्यात आली होती .
या सोहळ्यासाठी अनेक भाविकांनी आपल्या वतीने या सोहळ्यासाठी योगदान दिले होते जसे की महाप्रसादासाठी लागणारे साहित्य देण्यात आले होते काहींनी पूजेचे साहित्य व पाण्याची सोय देखील केली होती. काही भाविक दोन दिवस आधी आले होते त्यांची राहण्याची व जेवणाची सोय श्री स्वामी समर्थ संस्था कशेडी बंगला यांनी भाविकांची उत्तम प्रकारे सोय केली होती. तसेच अनेक गावांमध्ये ही सोहळा साजरा करण्यात आला होता काही ठिकाणी पालखी फिरवण्यात आली होती तसेच भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
अनेक भाविकांच्या उपस्थितीत भक्तीपूर्ण वातावरणात श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा संपन्न करण्यात आला.