• श्री जोगेश्वरी माता देवस्थान उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी नितिन राऊत तर उपाध्यक्षपदी रुपेश नागोठणेकर
रायगड वेध अनिल पवार रोहा
रोहा तालुक्यातील नागोठणे गावचे आराध्य ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता देवस्थान येथील उत्सवासाठी स्थापन करण्यात आलेल्या उत्सव कमिटीची मुदत संपल्यानंतर सन २०२२ ते सन २०२५ या तीन वर्षांसाठी नवीन उत्सव कमिटीची स्थापना करण्यासाठी नुकतीच एक महत्वपूर्ण बैठक श्री जोगेश्वरी माता मंदिरात आयोजित करण्यात आली होती. यावेळी या बैठकीत श्री जोगेश्वरी मातेचे खडकआळी येथील सेवेकरी नितीन राऊत यांची श्री जोगेश्वरी माता देवस्थान उत्सव कमिटी अध्यक्षपदी तर कुंभारआळी येथील रुपेश नागोठणेकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.याचबरोबर सचिवपदी आंगरआळी येथील मंगेश कामथे, सहसचिवपदी संजय नांगरे, खजिनदार प्रथमेश काळे,सहखजिनदार सुदर्शन कोटकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी या बैठकीला श्री जोगेश्वरी माता देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त नरेंद्र जैन, भाईसाहेब टके, हरिष काळे, माजी सरपंच विलास चौलकर, सुनिल लाड, उत्सव कमिटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब टके, उपाध्यक्ष विनायक गोळे, अनिल नागोठणेकर, रविंद्र राऊत, राजेश पिंपळे, प्रकाश मोरे, मंगेश पत्की, महेंद्र म्हात्रे, चेतन कामथे,मंदार चितळे यांच्यासह नागोठणेकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित विश्वस्त नरेंद्र जैन,भाईसाहेब टके,हरिष काळे,विलास चौलकर यांच्यासह उपस्थितांनी नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन राऊत यांच्यासह उपाध्यक्ष रुपेश नागोठणेकर व पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले तर मागील तीन वर्षात विविध कार्यक्रम उत्सव कमिटीने अतिशय उत्तमरीत्या पार पाडल्याने माजी अध्यक्ष बाळासाहेब टके यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा देखील पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.दरम्यान मागील दोन वर्षात कोरोना महामारीच्या काळात पालखी उत्सवांवर शासनाने बंदी घातल्याने चैत्र महिन्यात होणारा श्री जोगेश्वरी मातेचा पालखी सोहळ्यावर विरजण पडले असताना मात्र या वर्षी मोठ्या उत्साहात अतिशय भक्तिमय वातावरणात कोणताही अनुचित प्रकार घडणार याची दक्षता बाळगात रविवार दि.१७ तारखेपासून सुरू होणारा पालखी सोहळा सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य तसेच नागोठणेकर ग्रामस्थ यांच्या मदतीने व सहकार्याने अतिशय उत्तमरीत्या पार पाडला जाईल अशी ग्वाही यावेळी नितीन राऊत यांनी दिली.