Type Here to Get Search Results !

दिघी सागरी पोलिस ठाण्यात दत्तमंदिर पुनर्प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न


दिघी सागरी पोलिस ठाण्यात दत्तमंदिर पुनर्प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न


 रायगड वेध गणेश प्रभाळे बोर्ली पंचतन


श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील दिघी सागरी पोलीस ठाण्यात सोमवारी दत्त मंदिर पुनःप्रतिष्टापना कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. यावेळी मंदिरात दर्शनासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शवली. यामध्ये दोन दिवस दत्तमहाराजांच्या पुजेला सुरुवात झाली व दत्तमंदिर पुनर्प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात साजरा झाला. 

नव्याने बांधण्यात आलेल्या दत्त मंदीरामध्ये दोन दिवसापासूनच दत्तमूर्ती प्रतिष्ठापनेला सुरुवात झाली होती. विधिवत पूजन भक्तजनांच्या उपस्थित करण्यात आले. त्यानंतर मंदिरामध्ये सोमवारी महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले. दिघी सागरी पोलिस ठाण्याचे सहा पोलिस निरीक्षक संदीप पोमन यांसह सर्वच कर्मचारी एक वेगळा दिवस म्हणून भक्तिमय वातावरणात मग्न झाल्याचे दिसत होते. 
दर्शनाला आलेल्या प्रत्येकाला महाप्रसाद करून जाण्याचा आग्रह पोलिस करत होते. यामध्ये बोर्लीपंचतनसह परिसरातील शिस्ते, वडवली, भरडखोल, कोंढेपंचतन अशा अनेक गावातील भक्तांनी सहभाग घेतला. सहा पोलीस निरीक्षक पोमन यांच्या कारकिर्दीत हे मंदिर नव्याने होत आहे. याशिवाय त्यांच्या पुढाकाराने मंदिर परिसर सुशोभीकरण झाले आहे. पोलीस ठाण्यात कामानिमित्त येणाऱ्या सर्वांना पोलिसांची सहकार्याची भूमिका असल्याचे पाहायला मिळाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test