Type Here to Get Search Results !

महावितरण विभागाचा वीज ग्राहकांना शॉक • महावितरण कडून ॲडिशनल डिपॉझिट चार्ज,ग्राहकांमधून नाराजी


• महावितरण विभागाचा वीज ग्राहकांना शॉक

 • महावितरण कडून ॲडिशनल डिपॉझिट चार्ज,
ग्राहकांमधून नाराजी


रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा


वीज ग्राहकांना महावितरणने एक मोठा शॉक दिला आहे. महावितरण कडून ग्राहकांना ॲडिशनल सिक्युरिटी डिपॉझिट चार्ज केले जात आहे.ग्राहकांच्या १२ महिन्याच्या वीज बिलाची सरासरी काढून त्यातील दोन महिन्याचे बिल हे ॲडिशनल सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून चार्ज करण्यात आले आहे.आणि हे सिक्युरिटी डिपॉझिट भरले नाही तर कनेक्शन कट करण्याचा ईशारा महावितरण विभागाने दिला आहे. या अतिरिक्त डिपॉझिट बाबत कोणतीही आगाऊ सूचना महावितरण विभागाकडून देण्यात आलेली नाही. ज्या कालावधीमध्ये वीज जास्त लागते त्याच कालावधीमध्ये महावितरणने कोणतीही पूर्वसूचना न देता अतिरिक्त डिपॉझिट लागू केला आहे.८ मे पर्यंत हे अतिरिक्त वीज बिल भरण्याची मुदत आहे.मात्र महावितरणने अशी अधिक वसुली सुरू केलीच कशी असा प्रश्न आता वीज ग्राहकांमधून उपस्थित केला जात आहे.याआधी देखील ग्राहकांकडून अतिरिक्त वीज बिल घेण्यात आले असल्याचे महावितरण कडून सांगण्यात येत आहे. त्यावेळी एक महिन्याचे बिल घेतले जात होते मात्र आता दोन महिन्याचे बिल घेतले जात आहे. ग्राहकांचा विजेचा वापर वाढला असून भविष्यामध्ये जर तुम्ही वीजबिल भरले नाही आणि आणि ग्राहकांवर ते पेंडिंग राहिलं तर ग्राहकांच्या या अतिरिक्त सुरक्षा डिपॉझिट मधून कापून घेतले जाईल असा अजब दावा महावितरण कडून करण्यात आला आहे. तसेच डिपॉझिटच्या पैशातून मिळणारे व्याज ग्राहकांच्या वीज बिलातून समानियोजित करण्यात येईल असे महावितरण कडून सांगितले जात आहे. महावितरणच्या या निर्णयाबाबत ग्राहकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे कारण ज्या पद्धतीने सध्या विजेचे दर वाढले आहेत सर्वसामान्यांना ते परवडेनासे झालेले आहेत त्यातच लोडशेडिंग वारंवार वीज पुरवठा खंडित होणे यामुळे ग्राहक संतापलेले व त्रासलेले आहेत आणि अशातच आता अचानकपणे कुठलीही आगाऊ सूचना न देता अशा पद्धतीची ॲडिशनल बिले पाठविण्यात आलेली आहेत आणि ही वीज बिले तातडीने भरा असे महावितरण विभागाकडून सांगण्यात आले आहे.त्यामुळे वीज ग्राहकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test