Type Here to Get Search Results !

संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत २८ प्रकरणांना मंजुरी


संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत २८ प्रकरणांना मंजुरी


रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा


रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या शिफारशीनुसार गठीत करण्यात आलेल्या संजय गांधी निराधार अनुदान समितीची बैठक समितीचे अध्यक्ष रविंद्र दुर्गावले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार (दि.२६)रोजी तहसील कार्यालयात संपन्न झाली.या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत २८ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली तर केंद्र पुरष्कृत, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत २ प्रकरणे मंजुर करण्यात आली असून ऐकून ३० प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे.
    या बैठकीला संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष रविंद्र दुर्गावले, शासकीय सदस्य सचिव तथा तहसीलदार ए.एम.कन्नशेट्टी, महसूल सहाय्यक सचिन चाळके, नवनियुक्त सदस्य परशुराम वरंडे, संजय जाधव, नमीत पांढरकामे, कृष्णा चाळके, संदीप दळवी, समीर तळकर, प्रमोदिनी मेकडे, संपदा जाधव व ग्राम विस्तार अधिकारी उपस्थित होते. 

    या प्रकरणांमध्ये दर प्रति महिना रक्कम रु १००० ते १२०० मिळून ऐकून रक्कम रु २८४०० तसेच केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना ऐकून २ प्रकरणे ४०००० रु.असे ऐकून ६८,४०० रु.अनुदान लाभार्त्यांना वाटप करण्यासाठी बैठकीत मंजुरी देण्यात आली. संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष रविंद्र दुर्गावले यांनी सांगितले की दुर्गम भागातील गावा-गावातून तसेच तालुक्यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून गरीब व गरजू लोकांना याचा लाभ मिळेल यासाठी लक्ष्य केंद्रित केले पाहिजे.

 तसेच सध्यास्थिती संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण- ६४३, अनु जाती-७९,अनु जमाती-६९, श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजना-३५२, अनु जमाती-३०,अनु जाती-३८, इंदीरा गांधी,राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजना-१८८,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना-९०,राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना- ३ असे ऐकून १४९२ लाभार्थी योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती तहसीलदार ए. एम.कन्नशेट्टी यांनी नवनियुक्त समिती सदस्यांना दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test