राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांचे बंगल्यावर भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ म्हसळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुकमोर्चा काढुन केला जाहीर निषेध
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
दिनांक ८ एप्रिल २०२२ रोजी मुंबईत एसटी संपकरी कर्मचाऱ्यांचा संप मिटला असताना मा.न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवत आपल्यावर अन्याय झाला आहे याला फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष, राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्रजी पवार आणि त्यांचा परिवारच जबाबदार आहे असे गृहीत धरून कोणाच्यातरी सांगण्यावरून अचानकपणे शरदचंद्रजी पवार यांच्या मुंबई येथील सिल्वरओक निवासस्थानी जाऊन संपकरी एसटी कर्मचारी यांनी त्यांचे घरासमोर निदर्शने करून भ्याड हल्ला केला. केलेला हल्ला पूर्वनियोजित आसुन निव्वळ षडयंत्र होते. एसटी संपकऱ्यांनी केलेले कृत्य अशोभनीय आहे या कृत्याचे म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि तालुका लोकप्रतिनिधीनी म्हसळा ग्रामिण रुग्णालय ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मुकमोर्चा काढुन जाहीर निषेध केला आहे. या हल्ल्यामागे व हल्ला घडवून आणले त्या अज्ञात लोकांचा, शक्तीचा हात आसुन त्यांना व हल्ला करणाऱ्यांना शोधून शासनाने त्यांचेवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने मोर्चाद्वारे मा.जिल्हाधिकारी रायगड यांना म्हसळा तहसीलदार समीर घारे यांचे मार्फत निवेदन देवुन केली आहे. तालुका अध्यक्ष समीर बनकर यांचे नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात माजी सभापती छाया म्हात्रे, माजी उपसभापती संदिप चाचले, माजी सभापती महादेव पाटील, माजी पं.स.सदस्य मधुकर गायकर,जेष्ठ नेते अंकुश खडस, सतिश शिगवण, रियाज फकीह, शाहिद उकये, सलीम चोगले, गजानन पाखड, गजानन जंगम, प्रकाश गाणेकर,महिला अध्यक्षा रेश्मा काणसे, शहर अध्यक्षा शगुप्ता जहांगीर, युवती अध्यक्षा वृषाली घोसाळकर, गटनेते संजय कर्णिक, भाई बोरकर, नदीम दळवी,नगरसेवक संजय दिवेकर, सरोज म्हशीलकर, कासीम मेमन, अनिल टिंगरे, नईम दळवी, मंगेश म्हशीलकर आदि मान्यवर उपस्थित होते.