Type Here to Get Search Results !

पोलादपूर तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य पाऊस


पोलादपूर  तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य पाऊस


रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर


       हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार १८ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दर्शविण्यात आला होता.  शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाची सुरुवात झाली. त्यामुळे नाले व रस्ते जलमय झाले तसेच पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये भाज्यांची शेती तसेच फळबागा यांचे आतोनात नुकसान झालेले दिसून आले.
          अनेक ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच झाडांच्या फांद्या व काही ठिकाणी झाडे देखील कोलमडून पडली अचानक झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक गावांना याचा फटका बसला जसे की हलदुले, महालुंगे, कापडा, परसुले, कोतवाल, देवळा अशा अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला. तसेच अचानक पडलेल्या पावसामुळे वीजपुरवठाही खंडित झाला. रात्रभर विजांचा कडकडाट व हलक्या सरींचा पाऊस पडत असल्याने   नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test