• नेवरूळ केंद्रात साजरा झाला शाळापूर्व तयारी अभियान उपक्रम
● केंद्रातील सर्व शिक्षक व अंगणवाडी सेविकांनी घेतला होता सहभाग
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
कोरोना संकटामुळे दोन वर्षापासून शालेय मुलांची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी यावर्षी राज्याच्या शिक्षण विभागाने एक नवीन उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे. २०२२/२३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीच्या मुलांचा शाळा प्रवेश अतिशय उत्साहात साजरा होणार असून त्यासाठी राज्य स्तरावरून ते शाळा स्तरापर्यंत त्याची जोरदार तयारी सुरू आहे. गेली दोन वर्षे अंगणवाडीमध्ये शिकणारी मुले आता पहिलीत अचानक पणे प्रवेश घेणार आहेत. मुलांना शाळा ही आनंददायी वाटावी तसेच नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार पायाभूत साक्षरता अभियान सफल होण्याच्या दृष्टिकोनातून हे *शाळा पूर्वतयारी अभियान* चालू करण्यात आले आहे.
शाळापूर्व तयारी कशी करावी याबाबतचे तालुकास्तरावरील प्रशिक्षण गटशिक्षणाधिकारी श्री.मंगेश साळी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती म्हसळा येथे आयोजित करण्यात आले होते. तसेच शाळापूर्व तयारी अभियानाचे नेवरूळ केंद्राचे केंद्र स्तरावर मार्गदर्शन श्री.समीर पाष्टे सर व श्री. संदीप भोई सर यांनी केले. या शाळा पूर्वतयारी अभियानात एकूण सात टेबल असतात. प्रत्येक टेबलावर पहिलीत प्रवेश घेणारा विद्यार्थी व त्याचे पालक यांनी भेट देऊन, कृतीद्वारे, प्रात्यक्षिकाद्वारे, निरीक्षणाद्वारे त्या टेबलावरील क्षमता आनंदाने प्राप्त करण्याचा विद्यार्थी प्रयत्न करतात. जेणेकरून मुलांना अतिशय आनंद वाटेल व मुले शाळेत येण्यास उत्साही राहतील. तसेच विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक व भावनात्मक विकास किती झाला आहे याची जाण पालक आणि शिक्षक याना होईल या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांची तयारी घेता येईल यासाठी रा.जि.प.शाळा केलटे येथे अतिशय आनंदात आणि खेळीमेळीच्या वातावरणात नेवरूळ केंद्राचा शाळा पूर्वतयारी अभियान उपक्रम साजरा करण्यात आला.
या अभियानासाठी केलटे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच श्री.गणेश बोर्ले, नेवरूळ केंद्राचे केंद्रप्रमुख नितीन माळीपरगे, केलटे ग्रामपंचायत सदस्या सौ.प्रविणा कोबनाक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.श्रुतिका गिजे, श्री.तांबे, नेवरूळ केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व सहशिक्षक उपस्थित होते. त्याचबरोबर नेवरूळ केंद्रातील घुम अंगणवाडी सेविका सौ.अक्षता बिरवाडकर, सांगवड अंगणवाडी सेविका सौ.दर्शना मांडवकर, रुद्रवट अंगणवाडी सेविका सौ.संजना बौर्ले, नेवरूळ अंगणवाडी सेविका सौ.रिकामे, जांभूळ अंगणवाडी सेविका सौ.महाडिक, व केलटे गावातील पहिलीत प्रवेश घेणारे बालक व त्यांचे पालक मोठ्या उत्साहाने या शाळा पूर्वतयारी अभियानात सहभागी झाले.