Type Here to Get Search Results !

प्रवासा दरम्यान हरवलेली सोन्याचे दागिने असलेली बॅग पोलिसांनी दिली मालकाच्या ताब्यात पेण पोलिसांचे तसेच वाहतूक पोलीस रमेश गायकवाड यांचे विशेष कौतुक


• प्रवासा दरम्यान हरवलेली सोन्याचे दागिने असलेली बॅग पोलिसांनी दिली मालकाच्या ताब्यात 

• पेण पोलिसांचे तसेच वाहतूक पोलीस रमेश गायकवाड यांचे विशेष कौतुक 


रायगड वेध प्रशांत पोतदार पेण


खेड ते ठाणे असा आपल्या बुलेट वरून ता.२४ रोजी पत्नीसह प्रवास करत असताना प्रवासा दरम्यान हरवलेली दागिन्यांनी भरलेली बॅग पेण वाहतूक पोलिसांना मिळून आली असून पेण पोलिस ठाण्यात दागिन्यांची व संबंधितांची खातरजमा करून ती बॅग प्रभू रामचंद्र शिंदे वय ४० यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. याबात पेण पोलिसांचे तसेच वाहतूक पोलीस रमेश गायकवाड यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
 
प्रभु रामचंद्र शिंदे हे ठाणे येथुन आपल्या खेड येथे आपल्या पत्नी बरोबर खेड येथे गावी जात असताना त्यांच्या जवळ असलेल्या दोन बॅगा मधली 
( नंबर एम एच ०४जेइ २७९४) बुलेटला पाठीमागे बांधलेली सोन्याचे दागिने असलेले बॅग प्रवासा दरम्यान हरवली असल्याचे पनवेल तेथे आल्यावर लक्षात आल्याने पुन्हा परत त्याच मार्गावरून बॅग शोधत असताना पेण येथील वाहतूक पोलीस रमेश गायकवाड हे वारंवार मोबाईल फोन करत असल्याचे लक्षात आल्याने मोबाईल फोन उचलला असता मला बॅग त्यांच्या जवळ असल्याचे कळून पेण पोलिस ठाणे येथे येऊन प्रभू शिंदे यांचेच हरवलेले 
१)सोन्याचे मंगळसूत्र ,२) सोन्याचे कानातले २ जोड, ३) सोन्याचा १ हार, ४) सोन्याची अंगठी, ५) सोन्याची माळ, ६)सोन्याच्या कानातील बुगडी जोड़ १, ७) चांदिचा छल्ला, असे बॅगेतील दागिने असल्याची खातर जमा करून बॅग प्रभू शिंदे यांच्या ताब्यात देण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test