Type Here to Get Search Results !

पुसाटी येथे शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन


पुसाटी येथे शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन


रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा


तळा शहरातील पुसाटीवाडी येथे २ मे व ३ मे रोजी शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सोमवार दि.२ मे रोजी सकाळी ६ वा. महाराजांचा अभिषेक सोहळा,७.३० वाजता गारद(शिवगर्जना),८ वा.शिवज्योत,दुपारी १२ वा.महाप्रसाद,दुपारी ३ वा. पालखी मिरवणूक, रात्री ८ वा.मिरवणूक आगमण, रात्री ११ वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनशैलीवर प्रश्नमंजुषा कार्यक्रम हे कार्यक्रम पार पडणार असून मंगळवार दि.३ मे रोजी सकाळी ८ वा. सत्यनारायणाची महापूजा,दुपारी १२ ते २ वा. महाप्रसाद, ३ वा. लहान मुलांचे मैदानी खेळ, संध्याकाळी ५ ते ७ वा.महिलांसाठी पैठणी खेळ, रात्री ९ वा.सत्कार समारंभ, रात्री १०.३० वा.सांस्कृतिक कार्यक्रम(नृत्यस्पर्धा) हे कार्यक्रम पार पडणार आहेत.तरी सर्व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन ग्रामस्थ मंडळ व शिवसम्राट मुंबईकर मंडळ आणि महिला मंडळ पुसाटीवाडी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test