• भगवान महावीरांच्या विचारांचे आदर्श समाजांनी डोळ्यासमोर ठेवले पाहिजे -- पं.पु.आचार्य भगवान श्री. देवकीर्ती सुरीश्वर महाराज
• २१ एप्रिल रोजी जैन समाजातील मुलगी प्रणाली जैन घेणार दीक्षा
रायगड वेध प्रशांत पोतदार पेण
जैन समाजातील धर्मगुरू भगवान महावीर स्वामी यांची जीवनशैली अतिशय सुंदर असून त्यांनी भुतलावर असणा-या प्रत्येक जीवजंतू, प्राणीमात्रांवर प्रेम करण्याची शिकवण देऊन माणसांनी कोणतीही मोह, माया न बाळगता सुख आणि शांतीचे पाईक बनून जीवनात पीडा बिना, पैसा बिना, पाप बिना जीवन हेच साधूंचे जीवन आहे. त्यामुळे समाजानी त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असे वक्तव्य पं.पु.आचार्य भगवान श्री. देवकीर्ती सुरीश्वर महाराज यांनी केले.पेण शहरातील प्रसिद्ध कापड व्यापारी रविंद्र जैन यांची मुलगी प्रणाली रविंद्र जैन वय २८ हिचा दीक्षा महोत्सव कार्यक्रम २१ एप्रिल रोजी पं.पु.आचार्य भगवान श्री देवकीर्ती सुरीश्वर महाराज तसेच स्वाध्वी परमवर्धना श्री.जी.महाराज यांच्या उपस्थितीत पेण येथील तालुका क्रीडा संकुल येथे होणार आहे. या दिक्षा महोत्सवाची जय्यत तयारी जैन समाजाच्या वतीने मागच्या आठ दिवसांपासून सुरू आहे. या दिक्षा महोत्सवानिमित्त उपस्थित असणारे देवकीर्ती सुरीश्वर महाराज यांनी अधिक बोलताना सांगितले की पेण शहरात पहिल्यांदा असा दिक्षा घेण्याचा कार्यक्रम होत आहे.हा आनंद आम्हाला जसा आहे त्याहीपेक्षा जास्त आनंद दिक्षा घेणा-या प्रणालीला आहे