Type Here to Get Search Results !

तळा शहरात पार्किंग व्यवस्थेची आवश्यकता, पार्किंगची व्यवस्था नसल्याने उद्द्भवते वाहतूक कोंडीची समस्या


तळा शहरात पार्किंग व्यवस्थेची आवश्यकता.
पार्किंगची व्यवस्था नसल्याने उद्द्भवते वाहतूक कोंडीची समस्या


रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा


तळा शहरात पार्किंग व्यवस्थेची आवश्यकता भासत असून पार्किंग ची व्यवस्था नसल्याने बाजारपेठ परिसरात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.तळा बाजारपेठ ही लहान स्वरूपाची असून बाजारपेठेत खरेदीसाठी आलेले ग्राहक शहरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने आपली दुचाकी व चारचाकी वाहने बाजारपेठ परिसरात कोठेही पार्क करून ठेवतात. यामुळे समोरासमोर दोन एसटी बसेस किंवा ट्रक,टेम्पो आल्यास बेशिस्त पार्किंगमुळे तसेच अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. ही वाहतूककोंडी सुटताना बराचसा वेळ वाया जातो.काही वेळा बराच वेळ होऊनही ही वाहतूक कोंडी सुटत नाही त्यामुळे महत्वाच्या कामासाठी निघालेल्या नागरिकांना आपल्या इच्छितस्थळी वेळेवर पोहचता येत नाही. तर काही वेळेला शालेय विद्यार्थी व शासकीय कर्मचारी वर्ग आदींना या वाहतूक कोंडीमुळे उशिर होतो.शहरातील बळीचा नाका परिसर, बसस्थानक परिसर,मिनिडोअर स्टँड च्या समोर तसेच नगरपंचायतीसमोर दुचाकी व चारचाकी खाजगी वाहने अवैधरित्या पार्किंग केलेल्या असतात.त्यामुळे शहरात पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटेल.अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


तळा बाजारपेठेत चालक आपली वाहने कशीही पार्क करीत असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.तसेच बाजारपेठेत वाहतूक पोलीस नसल्याने बराचवेळ होऊनही ही वाहतूककोंडी सुटत नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
(प्रदीप मोहिते व्यापारी)

तळा बाजारपेठेत पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहनचालक आपली दुचाकी व चारचाकी कोठेही पार्क करून ठेवतात.बरेचसे दुचाकी चालक आपली दुचाकी एखाद्या दुकानासमोर दिवसभर सुद्धा लावून ठेवतात.त्यामुळे अशा अवैध पार्किंगमुळे दुकानदारांना देखील त्रास सहन करावा लागत आहे.
(अमोल हाटकर व्यापारी)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test