Type Here to Get Search Results !

अदितीला कॅबिनेट मंत्री पद मिळण्यासाठी पक्ष संघटना मजबूत झाली पाहिजे - जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील


अदितीला कॅबिनेट मंत्री पद मिळण्यासाठी पक्ष संघटना मजबूत झाली पाहिजे - जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील

• तुम्ही सर्वांनी केलेल्या मतदानामुळे आदिती तटकरे या राज्यमंत्री तथा पालकमंत्री झाल्या - खासदार सुनिल तटकरे    


 रायगड वेध श्रीकांत शेलार दांडगुरी


    राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेतून सर्व कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधून आपल्याला पक्ष संघटना मजबूत करायची असल्याने परिसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तर  पक्ष संघटना मजबूत झाली पाहिजे असे प्रतिपादन जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माणगाव येथे कार्यक्रमावेळी केले.
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पर्व ५ कोकण राष्ट्रवादी परीवार संवाद यात्रेचे आयोजन माणगाव  येथे करण्यात आले होते.यावेळी जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील,खासदार सुनील तटकरे,पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, महबुब शेख, श्रीवर्धन मतदार संघाचे अध्यक्ष महमद भाई मेमन, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, म्हसळा तालुका अध्यक्ष, समीर बनकर,  अंकित साखरे, राजू मोरे, अजय बिरवाडकर, आदी तसेच माणगाव, श्रीवर्धन तळा तालुका व शहर पदाधिकारी, मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ना. जयंत पाटिल म्हणाले की खासदार कसा असावा हे सुनील तटकरे यांच्या कामामुळे दिसून येत आहे. वेगवेगळया प्रश्नांची सोडवणूक करणे तसेच मंत्रालयातील कोणतेही काम असो यासाठी खासदार सुनील तटकरे हे नेहमी प्रयत्नशील असतात त्यांच्या मनात अनेक योजना असतात व ते आपल्या मतदारसंघाला योग्य न्याय देतात यामुळे आपल्या मतदार संघात कायापलट करु शकले तर येथील अनेक वर्षापासून रखडलेली विकास कामे देखील पूर्णत्वाकडे घेउन जातील यात शंका नाही आदिती तटकरे या कॅबिनेट मंत्री केले पाहिजे असे म्हणत ना. जयंत पाटील यांनी आदिती तटकरे यांच्या कामाचे कौतुक केले.
मतदार संघात वेगवेगळे विकास कामाचा प्रश्न राष्ट्रवादी पक्षाचा कडूनच पूर्ण करण्यात आला आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. श्रीवर्धन मतदार संघ अजून मजबुत करून पुढील निवडणुकीत अदीतीला मोठ्या मत धिक्य वाढून द्याल व पक्षसंघटना मजबूत करण्याचे काम सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनानुसार करत आहेत यामुळेच आजच्या कार्यक्रमाला महिलांची मोठी संख्या दिसून येत आहे तसेच श्रीवर्धन मतदार संघामध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढली आहे.राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी राष्ट्रवादी पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.राष्ट्रवादी पक्ष नंबर १ वरच राहणार असे यावेळी खासदार तटकरे यांनी सांगितले .श्रीवर्धन मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चांगले संघटन होत आहे.परंतु आता अजून विकासकामांनी भरून काढण्यात येत असल्याने राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test