Type Here to Get Search Results !

• चौफेर कामामुळे आदिती तटकरे या कॅबिनेट झाल्या पाहिजेत!


• पेण मतदार संघात निवडून यायचं असेल तर पक्ष संघटना मजबूत झाली पाहिजे - जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील

• चौफेर कामामुळे आदिती तटकरे या कॅबिनेट झाल्या पाहिजेत!


रायगड वेध प्रशांत पोतदार पेण


राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेतून सर्व कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधून आपल्याला पक्ष संघटना मजबूत करायची असल्याने परिसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच २०२४ मध्ये पेण मतदार संघात निवडून यायचं असेल तर पक्ष संघटना मजबूत झाली पाहिजे असे प्रतिपादन जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पेण येथे कार्यक्रमावेळी केले.

पेण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पर्व ५ कोकण राष्ट्रवादी परीवार संवाद यात्रेचे आयोजन पेण रविराज फार्म हाऊस येथे करण्यात आले होते.यावेळी जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील,खासदार सुनील तटकरे,रुपाली चाकणकर,पालकमंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे,महबुब शेख,अंकित साखरे,अजय बिरवाड कर, रुपाली चाकणकर, गीता परलेजा, सुरेश चव्हाण, सुधाकर घारे, विजय मोरे,संजय वढावकर आदी तसेच पेण तालुका व शहर पदाधिकारी,मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना ना. पाटिल म्हणाले की खासदार कसा असावा हे सुनील तटकरे यांच्या कामामुळे दिसून येत आहे. वेगवेगळया प्रश्नांची सोडवणूक करणे तसेच मंत्रालयातील कोणतेही काम असो यासाठी खासदार सुनील तटकरे हे नेहमी प्रयत्नशील असतात त्यांच्या मनात अनेक योजना असतात व ते आपल्या मतदारसंघाला योग्य न्याय देतात यामुळे आपल्या मतदार संघात मोठ्या मतांनी निवडून येतील तर येथील अनेक वर्षापासून रखडलेली पाणी पुरवठा योजना खासदार सुनील तटकरे पूर्ण करतील यात शंका नाही.सात आठ महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून हे काम पूर्ण करण्यात येईल असे ना. जयंत पाटील म्हणाले.
तसेच श्रीवर्धन मतदार संघ पुरते विकास कामे न करता जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चौफेर काम करणाऱ्या पालकमंत्री आदिती तटकरे या कॅबिनेट मंत्री केले पाहिजे असे म्हणत ना. जयंत पाटील यांनी आदिती तटकरे यांच्या कामाचे कौतुक केले तर मोदी सरकारमुळे गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल,आदी आवश्यक वास्तूमध्ये वाढ झाली असून महागाई वाढत आहे.सुधागड पाली मतदार संघात राष्ट्रवादी पक्षाची बांधणी करा मग घडाळ याच्या चिन्हा साठी ए बी फॉर्म ठेवतो असे ही त्यांनी शेवटी सांगीतले.

यावेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले की
खारेपाटातील पाण्याचा प्रश्न राष्ट्रवादी पक्षाचा कडूनच लवकरच पूर्ण करण्यात येईल तसेच बाळगंगा धरण लाभार्थी यांचे प्रश्न तसेच मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पेण मतदार संघात वर्षभरात पक्षसंघटना मजबूत करण्याचे काम सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनानुसार करत आहेत यामुळेच आजच्या कार्यक्रमाला महिलांची मोठी संख्या दिसून येत आहे तसेच पेण मध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढली आहे.राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी राष्ट्रवादी पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. निवडणुका वेळत झाल्या असत्या तर पेण नगरपालिकेत परिवर्तन झालेले दिसून आले असते. राष्ट्रवादी पक्ष नंबर १ वरच राहणार असे यावेळी खासदार तटकरे यांनी सांगितले 

पाच वर्षापुर्वी पेण मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चांगले संघटन होते परंतु दोन वर्षांमधील काळात मतदार संघात घट झालेली जाणवत आहे.परंतु आता मागील बॅक लॉक विकासकामांनी भरून काढण्यात येत असल्याने राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढत आहे.सुधागड मध्ये आदिवासींसाठी प्रकल्प,क्रीडा संकुल,रुग्णालय,पाली बल्लाळेश्वर मंदिर आदी विकासकामांसाठी निधीतून पेण, सुधागड,पाली मतदार संघात विकास कामे करण्यात येत असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी पेण तालुकाध्यक्ष दयानंद भगत यांनी पेण मतदार संघात हक्काचा माणूस हवा असल्याने आमदार अनिकेतभाई तटकरे यांना पेण मतदार संघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी करत पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनानुसार पेण मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्याचे काम सर्व करत असल्याचे सांगितले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test