Type Here to Get Search Results !

निडी तर्फे नागोठणे येथे शाळा पूर्व तयारी उपक्रमांतर्गत मेळावा संपन्न


निडी तर्फे नागोठणे येथे शाळा पूर्व तयारी उपक्रमांतर्गत मेळावा संपन्न 


रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


 रायगड जिल्हा परिषदेच्या शाळापूर्व तयारी उपक्रमांतर्गत रोहा तालुक्यातील नागोठणे जवळील कोंडगाव ग्रामपंचायतीमधील प्राथमिक शाळा निडी तर्फे नागोठणे येथे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षी दाखल होणाऱ्या मुलांचा मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. औक्षण करत शाळेत दाखल करून घेण्यात आले.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या काळात शाळा पुर्णतः बंद होत्या. त्यामुळे २०२२/२३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचन व लेखन संदर्भात कोणत्याही प्रकारचा अडथळा येवू नये यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा पूर्वतयारी या उपक्रमांतर्गत राजिप प्राथमिक शाळा निडी तर्फे नागोठणे या शाळेत शाळा कोंडगाव ग्रामपंचायत माजी सरपंच निखिल मढवी यांच्या पुढाकाराने पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, शिक्षक-पालक संघ तसेच ग्रामस्थांच्या समवेत संपन्न झालेल्या मेळाव्यात सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात निडी गावातील इयत्ता पहिली मध्ये नवीन दाखल होणाऱ्या ६ विद्यार्थ्यांची ढोल लेझीम पथक व वाद्य वाजवत गावातून मिरवणूक काढली. याचबरोबर मुलांच औक्षण करून मुलांना खाऊ वाटप करत या मुलांना प्राथमिक शाळेत दाखल करुन घेतले. यावेळी कोंडगाव माजी सरपंच निखिल मढवी यांच्यासह सदस्या प्रणाली मढवी, आरोग्य सेवक वंदन तांबोळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान मढवी, कैलास मढवी, मोरेश्वर मढवी, रमेश मढवी, शाळेचे मुख्याध्यापक रुपेश पाटील, शिक्षिका संध्या म्हात्रे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test