Type Here to Get Search Results !

श्रीवर्धन तालुक्यातील नागरिक आशेने बघतायेत. ●जीव वाचवण्यासाठी गाठावे लागतय मुंबई - पनवेल


• श्रद्धेच्या मंदिरांबरोबर अत्याधुनिक आरोग्य मंदिरेही उभारावीत 

●श्रीवर्धन तालुक्यातील नागरिक आशेने बघतायेत. 

●जीव वाचवण्यासाठी गाठावे लागतय मुंबई - पनवेल 

●मध्यवर्ती अद्ययावत हाॅस्पिटल नसल्याने प्रसंगी पेशंटला गमवावा लागतोय जीव 


रायगड वेध विजय कांबळे कापोली


जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी गरजेचे आणि नागरिकांना अत्यावश्यक असलेल्या सुसज्ज हाॅस्पिटलसाठी कुणा कडूनही प्रयत्न होताना दिसत नाहीत.मा. आमदार खासदार काही लोकप्रतिनिधी विकासकामे करत असताना मंदिरे ,सभागृह ह्यावर ज्या प्रकारे भर देत अनेक ठिकाणी मोठ मोठे श्रद्धेची मंदिरे जरूर बांधावीत नव नविन व्हायला हवीत कारण देवावर प्रचंड विश्वास आणि तेवढीच श्रद्धा आहे. भक्ती बरोबरच आरोग्य मंदिर अतिशय महत्त्वाचा आहे. कारण तेही मंदिरच आहे. सभागृह, समुद्र कीनारे, तलाव सुशोभिकरण या करिता मोठ्या प्रमाणावर करोडो रुपयांचा निधी शासन उपलब्ध करून देत आहेत. त्याच बरोबर अत्याधुनिक आरोग्य मंदिरेही उभारली जावीत .तालुक्यातील अनेक गावांतील वाड्या वस्ती शहराला जोडल्या आहेत.मोठे आणि खात्रीशिर हाॅस्पिटल नसल्याने विविध भागातील 
पेशंटचा जीव वाचावा त्यावर ताबडतोब उपचार सुरू व्हावेत यासाठी कुणीही पूढे सरसावत नाहीत. उच्च दर्जाचे उपचार व्हावेत म्हणून तश्या प्रकारच्या
हाॅस्पिटलसाठी पुढे येत नाहीत अशी तक्रार तालुक्यातील नागरिकांची आहे. मुंबई सारख्या शहरात पेशंटला उपचारासाठी घेऊन जायचे असेल तर लोकांचे प्रचंड हाल होतात.अनेकदा रस्त्यावर वाहनांच्या धडकेमुळे दुर्दैवाने मोठा अपघात झाला तर मुंबई शिवाय पर्याय नाही तेथील 
मोठ मोठ्या हाॅस्पिटलमधील बिलं लोकांना परवडणारी नाहीत. 

माणगांव, म्हसळा, श्रीवर्धन, बोर्लीपंचतन ,दिघी ह्या शहरी भागाला अनेक गावे जोडली गेली आहेत.आता तर होऊ घातलेला दिघी पोर्ट आणि भविष्यात तालुक्यात नव्याने कंपन्यां येऊ शकतील. त्यामुळे त्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. महाराष्ट्रात बाहेरचे कामगारही येणारच आताच काळजी घेतली नाही आणि अश्या ठिकाणी जर कुणाला अपघात झाला इमर्जन्सी आलीच तर जीवाशी खेळ खेळला जाऊ शकतो. 

एखादा व्यक्ती आजाराने गंभीर झाला तर त्याला मुंबई किंवा पनवेल गाठावे लागते. ह्या भागातील लोकं गरीब आणि बहुतेक शेतकरी असल्याने वाहनांचा खर्चही परवडत नाही. पर्यायी परिस्थिती नसल्याने जवळच्या खाजगी दवाखान्यात उपचार करुन घेतात पण तोपर्यंत उशिर झालेला असतो ही वस्तुस्थिती आहे. कधी कधी तर मित्र मंडळी आर्थिक मदत करतातही परंतु दूरचा प्रवास असल्यामुळे प्रसंगी रुग्णाला वाटेतच जीव गमवावा लागतो. 

अनेक वर्षे हाॅस्पिटलची समस्या असताना देखिल कुठलाही नेता किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी सुसज्ज हाॅस्पिटलसाठी आग्रही प्रयत्न करुन नागरिकांना होणारा त्रास दूर करताना दिसत नाहीत.अनेक निवडणुका येऊन गेल्या मात्र अद्ययावत हाॅस्पिटल हा जिव्हाळ्याचा विषय असूनही शासन दरबारी विषय लावून धरला जात नाही. 
बोर्लीपंचतन, श्रीवर्धन, माणगांव,म्हसळा ह्या ठिकाणी शासकीय रुग्णालये आहेत. परंतु तिथे त्या पद्धतीची औषधे ,रुग्णांना आवश्यक असलेली अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना पूढे उपचारासाठी पाठवले जाते. असे या भागातील लोकांचे म्हणणे आहे 


लोकप्रतिनिधी लक्ष घालणे आवश्यक आहे. 

बोर्लीपंचतन श्रीवर्धन येथील रुग्णालयात अनेक वेळा गरोदर महिलांची अवघड परिस्थिती असेल तर दोन जीवांशी खेळ मांडला जातो. एखाद्या महिलेला उच्च दाब असेल तर प्रसंगी अलिबाग गाठावे लागते. अनेक ठिकाणी खराब रस्त्यांमुळे वाहनातच प्रसूती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. महिलांना व रुग्णांना होणारा त्रास कुठे तरी कायमचा थांबावा ह्यासाठी संबंधित खात्याने व जागृत लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे आवश्यक आहे .


"गेली कित्येक वर्ष हा प्रश्न सामान्य नागरीक व पत्रकारांनी उचलून धरला आहे,सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे सुविधा युक्त उपचार स्थानिक हॉस्पिटलमधेच मिळावेत व उपचारासाठी माणगांव,मुंबई होणारी फरफट लवकरच थांबावी"

श्री. धवल तवसालकर
ग्रामपंचायत सदस्य वेळास

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test