Type Here to Get Search Results !

महेंद्र घरत’ कामगारांना सन्मान मिळवून देणारा कामगार नेता.


‘महेंद्र घरत’ कामगारांना सन्मान मिळवून देणारा कामगार नेता.


रायगड वेध विठ्ठल ममताबादे उरण


गोर गरिबांच्या, कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढणारे लढवय्ये कामगार नेते,महेंद्र घरत हे रायगड- नवीमुंबई मधील कामगारांचे आधारवड म्हणून ओळखले जातात. त्यांच्या न्यू मॅरीटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेचा आलेख दिवसेंदिवस चढता आहे. आत्ताच ओल्ड मर्स्क (APMT )मधील कामगारांचा कामगार कपात व पगारवाढीचा प्रलंबित प्रश्न त्यांच्या चाणक्ष नेतृत्वामुळे सोडविला गेला. व्यवस्थापनाचा ३५ कामगार कपातीचा डाव हाणून पाडून कामगारांना ७,३००/- रुपयांची पगारवाढ केली. १ मे पासून बंद होत असलेल्या हिंद टर्मिनल मधील ६०० कामगार हे कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन ताकदीने लढले व हिंद टर्मिनल व्यवस्थापनाला सर्व कामगारांना ५ कोटी रुपये कायदेशीर देणी देण्यासाठी भाग पाडले . तसेच कंपनी स्वतःहून बंद करत असल्यामुळे कामगारांना केलेल्या सेवेपोटी १५ लाख रुपये गुडविल रक्कम देण्याची मागणी महेंद्र घरत यांनी व्यवस्थापनाकडे केली. 
               पंजाब कॉनवेअर मधील स्वयंघोषित कामगार नेते बोंबलून सांगत आहेत की आम्ही कामगारांना न्याय दिला व कंपनी सुरु केली पण वस्तुस्थिती वेगळी आहे. किमान वेतन न देता फक्त ५ ते ८ हजारांवर कामगारांना कामावर बोलवून त्यांना न्याय दिला बोलत असतील तर कामगारांचे दुर्दैव आहे. पंजाब कॉनवेअर मध्ये मुख्य कंत्राटदार GDL आहे व सब कॉन्ट्रॅक्टर GAD लॉजिस्टीक्स आहे. जर पंजाब कॉनवेअर व GDL यांच्यातील करार ३१ जानेवारी २०२२ रोजी संपुष्टात आला तर कामगारांची कायदेशीर देणी त्यांना मिळालीच पाहिजेत तशी मागणी पहिल्यांदा महेंद्र घरत यांनी दोन्ही कंत्राटदारांकडे केली आहे.
             कामगारनेते महेंद्र घरत हे जसे बोलतात तसे वागतात याची CFS मधील कामगारांना जाणीव आहे व कामगार नेते महेंद्र घरत यांचा कामगारांना आधार वाटत आहे त्यामुळे CFS कामगारांचा ओघ त्यांच्याकडे वाढत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test