Type Here to Get Search Results !

शांतता अबाधित राखा - पोलिस अधिक्षक अशोक दुधेपेण शहराची शांततेची प्रतिक म्हणुन ओळख - आमदार रविशेठ पाटिल


शांतता अबाधित राखा - पोलिस अधिक्षक अशोक दुधे

पेण शहराची शांततेची प्रतिक म्हणुन ओळख - आमदार रविशेठ पाटिल


रायगड वेध प्रशांत पोतदार पेण


 पवित्र अशा रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव उपवासाचे रोजे ठेवतात या निमित्त पेण पोलिस ठाण्याच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन सौभाग्यइन हॉटेल येथे करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित आमदार रविशेठ पाटिल यांनी पेण शहर शांततेचे प्रतिक आहे. येथिल हिंदु मुस्लिम एकमेकांच्या सुख दुःखात सामिल होणारे आहे.इथे समाजा समाजा मध्ये दूजाभाव केला जात नसल्याचे त्यांनी सांगितले
तर 
रायगडचे पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांनी पेण शहरातील शांतता अबाधित राखण्याचे काम हिंदु मुस्लिम बांधवांनी केले आहे ते असेच पुढे ही ठेवा असे सांगितले.

यावेळी मुस्लीम समाज बांधव रशाद मुजावर,हबीब खोत,मुदू अखवारे,आदी व हिंदू समाज बांधव विशाल बाफना, रूपेश पाटिल,अशोक मोकल,दयानंद भगत, जितू ठाकुर,तसेच डी.वाय.एस.पी विभा चव्हाण, पेण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, दादार सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंदराव पाटिल, वडखळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार तसेच पोलिस कर्मचारी इफ्तार पार्टी वेळी उपस्थीत होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test