Type Here to Get Search Results !

बुधवारी १३ एप्रिल रोजी पोलादपूरचे ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथांचा जत्रोत्सवाचा शानदार सोहळा होणार साजरा


बुधवारी १३ एप्रिल रोजी पोलादपूरचे ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथांचा जत्रोत्सवाचा शानदार सोहळा होणार साजरा

 रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर


कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर शहरातील श्रीकाळभैरवनाथांचा यात्रोत्सव आगळावेगळा व वैशिष्ट्यपूर्ण असा समजला जाणारा उत्सव आहे.पोलादपूरचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थान हे अतिशय पुरातन व ब्रिटिश काळातील १८ व्या शतकात सनद प्राप्त देवस्थान आहे. श्री काळभैरवनाथ महाराजांचा आजही शेकडो वर्षाची परंपरा व रुढि जपत यात्रोत्सव साजरा केला जातो. यावर्षी बुधवारी १३ एप्रिल रोजी श्री काळभैरवनाथ महाराजांचा यात्रा उत्सव साजरा होणार असून भाविकांमध्ये उत्साह आहे
          जत्रोत्सवात येणारे भाविक प्रथम सानेवर श्री काळ भैरवनाथ जोगेश्वरी लांबलचक रांगेत जाऊन नतमस्तक होऊन सहकुटुंब व मित्रपरिवार सहित यात्रोत्सवाच्या ठिकाणी असणाऱ्या विविध दुकानांतून फिरत वेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आकाश पाळण्यासह वेगवेगळ्या फिरत्या चक्रांवर बसण्याचे मजा रात्रभर लुटतात .जत्रोत्सवासाच्या दिवशी पोलादपूर तालुक्यातील आठ गावांतील काठ्या पालख्या श्री काळभैरवनाथांच्या भेटीसाठी सहाणेवर येतात. रात्री ११ नंतर एकामागोमाग एक काठ्या-पालख्यांची रांग सुरू असते व काठीपालखी सोबत असलेला खालुबाजाच्या ठेक्याने संपूर्ण शहरात गगनाला भिडणारा उत्साह तठेक्यात हरवून जातो.यावेळी आठ काठ्या पालख्यां समवेत आलेल्या आठ खालुबाजापथक आपापल्या कलागुणांचा कसरत करत जोरदार खालुबाजाचा ठेका धरतात 
        जत्रोत्सवासाठी आलेल्या एकामागोमाग आठ काठ्या पालख्या सहणेवरील प्राणांगनात आल्यानंतर यात्रेतील लाखोंच्या गर्दीतून कसरतीने नाचवत नेऊन सहणेच्या शेजारी वृक्षाच्या आधारे उभ्या केल्या जातात व भाविक ही कसरत आवडीने पाहत असतात . आठ गावच्या सर्व काठ्या पालख्यांच सहाणेवर विराजमान झाल्यानंतर सर्व गावच्या पालख्यांचे एकत्रित असण्यामुळे त्याठिकाणच वातावरण भक्तिमय पाहायला मिळालं.
       पाहटे ५ वाजेनंतर यात्रोत्सवाची सांगता होते व जमलेल्या सर्व काठ्या पालख्या श्रीकाळभैरवनाथ मंदिराच्या टेकडीला प्रदक्षिणा मारण्यासाठी रवाना होतात.यावेळी पोलादपूर सह आठ गावच्या काठ्या पालख्या एकत्रित जात असताना टेकडीवर आठ काठ्या व आठ पालख्या एकत्रित नाचविण्यात येतात व हे सर्व गगनाला गवसणी घालणारे दृश्य पाहायला मिळते.असा हा पोलादपूर श्री काळभैरवनाथांचा उत्सव कोकणातील आनंदी यात्रोत्सव समजला जातो. १३ एप्रिल रोजी बुधवारी पोलादपूर शहरातील सहाणेवर श्री काळभैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव भक्तिभव वातावरणात साजरा होणार असून देवस्थान कमिटीच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती कमिटीचे अध्यक्ष बाबुराव महाडिक यांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test