पोलादपूर येथे श्री काळभैरवनाथाचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर
पोलादपूरचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज हे जागृत देवस्थान आहे येथे दरवर्षी मोठ्या उत्साहाने जत्रा उत्सव साजरा केला जातो. लोक मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहतात.
दोन वर्ष कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावामुळे हा उत्सव येथील पुजारी व मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला गेला होता. परंतु कोरोना नियमांमध्ये शिथिलता आली आहे त्यामुळे परंपरेनुसार मोठ्या उत्साहाने यात्रा उत्सव साजरा करण्यात आला लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सडवली, काटेतळी, वाकण अशा अनेक गावांमधून या उत्सवासाठी मोठ्या काठ्या व सजवलेल्या पालख्या वाजत गाजत रात्री अकरा वाजता आगमन झाले होते तसेच संस्थेकडून प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्यात आली होती रुग्णवाहिका व पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता लोकांसाठी पाण्याची सोय करण्यात आली होती संस्थेची माणसं देखरेखीसाठी होती. कामानिमित्त मुंबई पुणे अशा ठिकाणी जाणारे चाकरमानी खास या उत्सवासाठी उपस्थित होते तसेच पोलादपूरमधील स्थानिक लोक या कार्यक्रमात मोलाचे योगदान होते.
लोक आधी श्री काळभैरवनाथ महाराज यांच्या पालखीचे साणे वरती जाऊन दर्शन घेतात त्यानंतर जत्रेचा आस्वाद घेतात लहान मुलांना आकर्षक पाळणे केलेली सजावट पाहून खूप हुरुप येतो अनेक खेळण्याची दुकाने देखील होती. ज्या लोकांचा रोजगार हा पूर्णपणे या उत्सवावर अवलंबून असतो गेली दोन वर्ष असे कार्यक्रमास बंदी होती म्हणून त्यांचा रोजगार ठप्प झाला होता परंतु आता नव्याने सुरू झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसत आहे.
देवस्थान कमिटी व भैरवनाथ नगर मित्र मंडळ यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते अशा प्रकारे श्री काळभैरवनाथ यात्रोत्सव श्रद्धा पूर्ण भक्तीमय वातावरणामध्ये संपन्न झाला.