• लिंबाच्या भावात वाढ..ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्य माणसाला लिंबु पाणीही झाले दुर्मिळ
रायगड वेध अभिजीत मुकादम
एरवी घरोघरी सहजपणे उपलब्ध असणारा लिंबू आता दुर्मिळ वस्तू झाला आहे. लिंबू पाणी हे उन्हाळ्यात सामान्य माणसाचे थंड पेय मानले जाते. मात्र आता लिंबूचे भाव गगनाला भिडल्याने साधे लिंबू पाणी हे श्रीमंतांचेच पेय बनले आहे. मागील काही दिवसात सर्वत्रच लिंबूच्या भावात प्रचंड वाढ होत असल्याने तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. अवकाळी पाऊस, वातावरणात सातत्याने होणारे बदल यामुळे लिंबूचे मर्यादित उत्पादन झाले आहे आणि त्यामुळे लिंबाचा पुरवठा मर्यादित आहे. त्यातच डिझेलच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने राज्यातील विविध जिल्ह्यांतुन होणाऱ्या लिंबाच्या सामान्य पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे लिंबूच्या भावात प्रचंड वाढ झाली आहे." सध्या किरकोळ बाजारात एक लिंबू १० ते १५ रुपयांना विकला जात आहे. मध्यमवर्गीयांसाठी ही प्रचंड अडचणीची बाब ठरते आहे. कारण बहुतांश सर्वसामान्य नागरिकांना दुपारी लिंबू पाणी पिण्याची सवय आहे. तापमान जेव्हा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाते तेव्हा लिंबू पाण्याचा मोठा आधार असतो.