• कोतवाल येथे ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटन व विविध विकासकामांचे भूमिपूजन
रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर
पोलादपूर तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कोतवाल खुर्द येथे बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन सोहळा आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते संपन्न झाला आहे तसेच गावच्या हद्दीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन देखील करण्यात आले आहे. यावेळी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय, सामाजिक सभागृह कोतवाल रेववाडी या कामांचे उदघाटन व बौद्धवाडी अंतर्गत रस्त्याची संरक्षण भिंत, रोहिदास वाडी अंतर्गत रस्ता, रस्त्याची संरक्षण भिंत,पाणी टाकी या कामांचे भूमिपूजन करण्यात आले असून ग्रामस्थांच्या वतीने आमदार गोगावले यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, शिवसेना तालुकाप्रमुख निलेश अहिरे, संपर्कप्रमुख किशोर जाधव, पंचायत समिती सदस्य यशवंत कासार, कोंढवी विभाग प्रमुख सतीश शिंदे,सरपंच नामदेव शिंदे,माजी सरपंच अविनाश शिंदे, उत्तम जाधव,सुरेश शिंदे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.