Type Here to Get Search Results !

इफ्तार पार्टीमधून सामाजिक सलोखा• दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन• सामाजिक सलोखा राखण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांचे आवाहन


• इफ्तार पार्टीमधून सामाजिक सलोखा

• दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

• सामाजिक सलोखा राखण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांचे आवाहन


रायगड वेध श्रीकांत शेलार दांडगुरी


 रमजान महिन्यामध्ये अनेक ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. या इफ्तार पार्टीमधून सामाजिक सलोखा राखला जातो. कोणीही कायदा-सुव्यवस्था बिघडवू नये. सोशल मीडियाद्वारे काही चुकीचे आणि फेक मेसेज पाठवले जातात, त्याला कोणीही बळी पडू नये. असे काही निदर्शनास आल्यास पोलिसांना कळवावे. दोषींवर पोलिस प्रशासन निश्चित कडक कारवाई करेल, असे बोर्लीपंचतन येथील दिघी सागरी  पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक संदीप पोमन यांनी सोमवारी (दि. ११) येथे सांगितले. ते पोलीस ठाण्यात आयोजित इफ्तार पार्टी मध्ये बोलत होते. 
दिघी सागरी पोलिस ठाण्याच्या वतीने ठाण्यात सोमवारी सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. 
या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी श्रीवर्धन मतदारसंघाचे अध्यक्ष महमद मेमन, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शामकांत भोकरे, सुकुमार तोडलेकर, दिवेआगर गणपती ट्रस्टचे अध्यक्ष महेश पिळणकर, दिवेआगर सरपंच उदय बापट, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. वेळी ते म्हणाले  सर्व मुस्लीम बांधव,हिंदू बांधव आज इफ्तार पार्टीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत गेले दोन वर्षात कोरोना जागतिक महामारीच्या निर्बंधांच्या कारणास्तव ईप्त्यार पार्टी झाली नव्हती. यावेळेस सर्व निर्बंध उठल्यामुळे आपण इफ्तार पार्टीचे आयोजन केलेले आहे.आपण सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभारी आहे आणि आमच्या रायगड पोलीस दलाच्या वतीने मी आपल्या सर्वांना पवित्र रमजान महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो जरी आपण पार्टीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलो हे फक्त निमित्त आहे आपण सर्वांनी एकत्रित सोबत येण्याचा सोबत भेटण्याचा बसण्याचा इथून पुढे कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आपण नेहमी भेटत राहू भेट होणे आवश्यक आहे एकमेकांचे विचार एकमेकासोबत करणे आवश्यक आहे पोलीस आणि जनता ह्या दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून पुढे चालणे आवश्यक आहे कारण कुठलेही प्रशासन एकटे काही करू शकत नाही जोपर्यंत त्यांना जनतेची साथ नाही तर हे धर्म कुठलाही असो सर्वांनी मिळून मिसळून सोबत चालायचा आहे पवित्र रमजान महिना हा शांती आणि अमन महिना आहे. आपण असेच ऋणानुबंध शेवटपर्यंत जपला सर्वजण सोबत घेऊन चालूयात दिघी सागरी पोलिस ठाण्याच्या वत्तीने व रायगड पोलीस दलाच्या वतीने मी आपल्या सर्वांना पवित्र रमजान महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो जरी आपण या ठिकाणी उपस्थित असलो हे फक्त निमित्त आहे आपण सर्वांनी एकत्रित सोबत येण्याचा सोबत भेटण्याचा बसण्याचा इथून पुढे कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आपण नेहमी भेटत राहू भेट होणे आवश्यक आहे एकमेकांचे विचारांची देवाणघेवाण एकमेकासोबत करणे आवश्यक आहे. पोलीस आणि जनता ह्या दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून पुढे चालणे आवश्यक आहे कारण कुठलेही प्रशासन एकटे काही करू शकत नाही तोपर्यंत त्यांना जनतेची साथ नाही तर हे धर्म कुठलाही असो सर्वांनी मिळून मिसळून सोबत चालायचा आहे पवित्र रमजान महिना हा शांती आणि अमन महिना आहे आपल्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा देतो आपण असेच ऋणानुबंध शेवटपर्यंत जपला सर्वजण सोबत चालू यात आणि आपण पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या ठिकाणी मनापासून उप विभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी यांनी आभार मानले.
 यावेळी दिघी सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिंदू मुस्लिम मोठ्या सखेने उपस्थीत होते. उपस्थित नेते मंडळींनीही एकमेकांना खजूर खाऊ घालून इफ्तार पार्टीचा आनंद घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test