• गोरेगाव मध्ये तीन अभिनेत्रीच्या उपस्थितीत हळदीकुंकु समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
रायगड वेध गिरीश गोरेगावकर माणगाव
गोरेगांव येथील राजमाता जिजाई मैदानावर रमेशदादा मोरे मित्रमंडळच्च्या वतीने हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभास उपस्थितीत असलेल्या मराठी अभिनेत्रीनी गोरेगांवकर महिलांची मने जिंकली.
शेतकरी कामगार पक्षाचे माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्या संकल्पनेतून, रमेशदादा मोरे मित्रमंडळाचे वतीने गोरेगांव येथे हळदीकुंकू समारंभाचे आयोजन काल शनिवारी सायंकाळी करण्यात आले होते. या कार्यक्रमास शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील,कृषिवलच्या व्यवस्थापकीय संचालक सौ. चित्रलेखा पाटील, शिवसेनेचे नेते ॲड. राजीव साबळे, शेकापचे नेते अस्लम राऊत, जिल्हा परिषद सदस्य सौ. आरती मोरे, चिंचवलीच्या सरपंच सौ. श्रुती कालेकर, गोरेगांव ग्रामपंचायतीच्या सदस्य आणि माजी सभापति सौ. अरूणा शेठ यांच्यासह सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी फेम अभिनेत्री स्वरदा ठिगले, ‘बॉस माझी लाडाची` फेम अभिनत्री भाग्यश्री लिमये, ‘असे सुंदर माझे घर फेम अभिनेत्री संचिता कुलकर्णी आणि सुमारे दोन ते अडीच हजार महिला उपस्थितीत होत्या.
यावेळी आपल्या मनोगतात आ. भाई जयंत पाटील यांनी महागाईच्या या दिवसात समेश मोरे यांनी महिलांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करुन दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. सौ. चित्रलेखा पाटील यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी उपस्थितीत या तिनही अभिनेत्रीनी महिलाशी संवाद साधून, त्यांना मालिकेबाबत काही प्रश्न विचारले आणि उखाणा घेण्यास सांगून, त्यांचेबरोबर सेल्फी काढले.