Type Here to Get Search Results !

ग्रामीण प्रिमियर लीगचे राष्ट्रवादीचे नेते सदानंद गायकर यांच्या हस्ते शानदार उद्घाटन


• ग्रामीण प्रिमियर लीगचे राष्ट्रवादीचे नेते सदानंद गायकर यांच्या हस्ते शानदार उद्घाटन  
 

रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


नागोठणे ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित पाटणसई - वाकण येथील कै. देविदास गणपत गायकर क्रीडांगण येथे शुक्रवार दि. १ एप्रिल ते रविवार दि. ३ एप्रिल दरम्यान संपन्न होणाऱ्या भव्य दिव्य अशा ग्रामीण प्रिमियम लीग २०२२ चे उदघाटन रोहा पं. स. चे माजी सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते पाटणसई ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक सदानंद गायकर यांच्या हस्ते दि. १ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या प्रिमियम लीगचा उदघाटणीय सामना श्री मरिआई वांगणी संघ व नवनाथ इलेव्हन कोंडगाव संघ यांच्यात खेळविण्यात आला. यामध्ये श्री मरिआई वांगणी (संघ मालक मोरेश्वर तेलंगे )या संघाने विजय मिळूवुन या स्पर्धेत विजयाने प्रारंभ केला. दरम्यान नागोठणे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने ग्रामीण प्रिमियम लीगची स्थापना करून ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ग्रामीण प्रिमियम लीगचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. तसेच या क्रिकेट स्पर्धेत सहकार्य करणारे संघ मालकांनी आपल्या संघात ठासून ठोकून निरखून पारखून अनुभवी खेळाडूंची निवड केल्यामुळे या स्पर्धेतील सर्व सामने चुरशीची होणार आहेत. तसेच कै. देविदास गायकर क्रीडांगण हे नेहमीच खेळाडूंसाठी उपलब्ध राहणार असल्याची ग्वाही आपल्या उद्घाटनीय भाषणात सदानंद गायकर यांनी उपस्थित खेळाडूंना दिली. 
             ग्रामीण प्रिमियम लीगच्या उदघाटनाप्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष शिवराम शिंदे, विभागीय ज्येष्ठ नेते मधुकर ठमके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय अध्यक्ष पिगोंडे सरपंच संतोष कोळी, पाटणसई उपसरपंच सुरेश गायकर, पाटणसई माजी उपसरपंच पांडुरंग गायकर, पाटणसई ग्रा. स. विभागीय कार्याध्यक्ष सचिन कळसकर, ग्रा. स. ऐश्वर्या कोतवाल, ग्रा. स. यामिनी कोतवाल संघ मालक एकनाथ ठाकुर, प्रमोद जांबेकर, शेखर ठाकुर, मोरेश्वर तेलंगे, किसन बोरकर, प्रह्लाद राणे, सुभाष मढवी, मोहन बुरुमकर, संकेत जयगडे, दिपक महाडिक, वांगणी माजी सरपंच लहू तेलंगे, वांगणी माजी उपसरपंच विनायक तेलंगे, मधुकर महाडिक, बाळासाहेब वाजे, हेमंत गायकर, शिवराम गायकर, मधुकर गायकर, अनिल कासार आदींसह ग्रामस्थ व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. दरम्यान ग्रामीण प्रिमियम लीग यशस्वी करण्यासाठी आयोजक कमिटी अध्यक्ष प्रतिक गायकर, उपाध्यक्ष मनोज वाजे, सचिव आकेश हारपाल, खजिनदार संदेश कासार, सर्व पदाधिकारी व सदस्य मेहनत घेत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test