Type Here to Get Search Results !

भरतीच्या पाण्याने होतेय शेतीची नासाडी • दिवेआगर येथील यशवंती खारभूमी कडे शासनाचे दुर्लक्ष, पक्के दरवाजे बसवण्याची मागणी


• भरतीच्या पाण्याने होतेय शेतीची नासाडी 

• दिवेआगर येथील यशवंती खारभूमी कडे शासनाचे दुर्लक्ष, पक्के दरवाजे बसवण्याची मागणी


रायगड वेध रमेश घरत शिस्ते


श्रीवर्धन तालुक्यातील गेली दोन वर्षे चक्रीवादळ मुळे अगोदरच शेतकऱ्यांच्या बागायत व शेतीचे नुकसान झाले आहे. त्यातच शिस्ते - दिवेआगर मार्गावरील यशवंती खारभूमीलगत असणाऱ्या खाडीचे चे दरवाजे तुटल्याने समुद्राच्या भरतीचे पाणी शेतात घुसू लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना गेली तीन वर्षे भातशेतीला मुकावे लागत आहे. 


दिवेआगर खाडी लगत बोर्लीपंचतन परिसरातील ४ ते ५ गावांतील अनेक शेतकऱ्यांची साधारण २०० ते ३०० हेक्टर क्षेत्रात खारशेती जमीन आहे. त्यात शेतकरी दरवर्षी भातशेतीचे उत्पन्न घेतात. समुद्राच्या खाडीतून शेतात समुद्राचे पाणी जाऊ नये यासाठी भक्कम दरवाजे असलेली 'सात उघडी' आहे. मात्र, गेली सलग तीन चार वर्षे उधाणाच्या भरतीमुळे हे दरवाजे उध्वस्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली जाते. पावसाळ्यात तर ही परिस्थिती गंभीर असते. हाताशी आलेली पिके उधानाच्या पाण्यामुळे नष्ट होतात.  याबाबतीत अनेक वेळा आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडे स्थानिकांनी लक्ष देण्याची मागणी केली.  खारभूमी सर्व्हेक्षण व अन्वेक्षण विभागाकडून नुकतीच नवीन झडपे लावण्यासाठी निविदा प्रक्रिया करण्यात आली मात्र त्या लाकडी स्वरूपातील आहेत. 


लाकडी झडपा किती टिकणार ?
प्रत्यक्षात लावणीपूर्वी झडपा बसवणे आवश्यक होते सध्या लाकडी झडपा लावणार असल्याचे समजते आहे मात्र समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे लाकडी दरवाजे कसे टिकणार असा संतप्त सवाल शेतकरी विचारु लागलेत. खाऱ्या पाण्यामुळे शेतीची सुपीकता धोक्यात आली आहे.   

सध्या तात्पुरती व्यवस्था म्हणून यशवंती खारभूमी योजनेत लाकडी दरवाजे लावत आहोत. त्यामुळे शेती भागात पाणी जाणार नाही. भविष्यात शेतीचे नुकसान होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाय म्हणून फायबर चे दरवाजे लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पुढील वर्षी तसे दरवाजे लावू. याव्यतिरिक्त शिस्ते येथील तिन उघडीचे तीन फायबर दरवाजे निवीदा प्रक्रिया मध्ये आहे हे तिन फायबर दरवाजे पावसाळी पूर्वी बसवण्यात येतील. 
        ---- जगदीश पाटील, सहाय्यक अभियंता पेण

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test