• पोलादपूर तालुक्यातील शासकीय आरोग्य मेळाव्यास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर
केंद्र सरकार मार्फत आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील लोकांना आरोग्यविषयक माहिती मिळावी व त्यांचा मोफत उपचार व्हावे या उद्दिष्टाने या आरोग्य मेळावा पोलादपूर शासकीय रुग्णालयात या आयोजन केले होते.
गेली दोन वर्ष कोरोना च्या पार्श्वभूमीवर संचार बंदी असल्याने आयोजन करण्यात आले नव्हते. ग्रामीण भागातील लोक या शिबिरामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टरांकडून योग्य ते मार्गदर्शन देऊन पुढील उपचारा संबंधी माहिती देत होते तसेच विविध तज्ञ डॉक्टर यांनी उपस्थिती दाखवली होती तसेच रुग्णांना मानसिक आधार देत होते आणि योग्य तपासणी करून पुढील उपचारासाठी मार्गदर्शनही करत होते. डॉक्टर सलागरे, डॉक्टर भूषण, डॉक्टर पाटील मॅडम, डॉक्टर गायकवाड, यांनी पुढाकार घेतला स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी फीत कापून शिबिराला सुरुवात केली.
खेडे गावातील लोकांना वाहतूकीची साधने कमी असल्याने त्यांना रुग्णवाहिकेच्या सहाय्याने शिबिरामध्ये आणण्यात आले होते व सर्वांसाठी चहा व नाष्टयाचे आयोजनही करण्यात आले होते तसेच उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले व ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय व शेतकरी मजूर अशा अनेक वर्गातील माणसांनी हजेरी लावली येणाऱ्या लोकांनी डॉक्टर तसेच तेथील कर्मचारी वर्ग सहाय्यक वर्ग यांचे आभार मानले.
नेत्रचिकित्सा त्वचारोग स्त्रीरोग अशा अनेक प्रकारच्या रोगांसाठी तज्ञ डॉक्टर असल्याने रोगाचे योग्य प्रकारे निदान करण्यात आले होते ज्या रुग्णांची उपचार करण्याची आर्थिक परिस्थिती नसल्यास त्यांना डॉक्टरांकडून वेगवेगळ्या योजनेबद्दल माहिती देण्यात आली होती. राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन अलिबाग कडून या शिबिरासाठी निधी देण्यात आला होता या आरोग्य मेळाव्यासाठी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर तसेच आशा सेविका व सहाय्यक कर्मचारी आणि स्थानिक कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने हा मेळावा व्यवस्थित रित्या संपन्न झाला.
Very good news update
ReplyDelete