दिघी जवळील हारवित खाडी लगत आढळला मृतावस्थेत महाकाय मासा
रायगड वेध अभय पाटील
श्रीवर्धन तालक्यातील दिघी पोर्ट लगत असलेल्या हरवित गाव हद्दीतील खाडीच्या किनाऱ्यावर प्रचंड मोठ्या आकाराचा मृत अवस्थेतील व्हेल प्रजातीचा मासा आढळून आला आहे. मृत महाकाय असणाऱ्या माश्याला पहाण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
हारवित येथील समुद्रकिनारी आज शुक्रवारी सकाळी महाकाय मासा मृतावस्थेत आढळला. हा मासा व्हेल प्रजातीचा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हरवित खाडी समुद्रकिनारी असणाऱ्या ग्रामस्थांना सकाळी महाकाय मासा दिसला. ग्रामस्थांनी पाहणी केली असता तो मृतावस्थेत असल्याचे लक्षात आले. हा मासा अंदाजे ३० ते ४० फूट लांब असून दिघी पोर्ट कडे येणाऱ्या तसेच समुद्रातून जाणाऱ्या मोठ्या जहाजाच्या पंख्यामध्ये अडकल्याने हा मासा मृत झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
तर दिघी पोर्ट कडे येणाऱ्या मोठ्या झाजाचावपरिणाम समुद्री जिवाना पोहचत असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे, तर समुद्राच्या प्रवाहासोबत हा मासा वाहत किनाऱ्यावर आला असल्याची आहे.