• बोर्ली पंचतन व वडवली साठी विविध विकासकामांसाठी भरघोस निधी
• बोर्ली पंचतन पुरातन गणपती मंदिरासाठी ६७ लक्ष तर तलाव सुशोभीकरणासाठी ०१ कोटी
• वडवली आदर्श सांसद गावातील अंतर्गत रस्त्यासाठी ८० लक्ष रुपये मंजूर
रायगड वेध अभय पाटील
महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील सुमारे २०० वर्षे पूर्वीचे पुरातन गणपती मंदिरासाठी ६७ लक्ष तसेच तलाव सुशोभीकरणासाठी ०१ कोटी तसेच वडवली गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी ८० लक्ष रुपये निधी मंजूर केल्याचे पत्र खासदार सुनील तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांनी सुटारवादी येथे बोर्ली पंचतन व वडवली येथील सरपंच व पदाधिकारी ग्रामस्थ यांचे कडे सुपूर्द केले.
बोर्ली पंचतन येथील सुमारे २०० वर्षे पुरातन असणारे गणपती मंदिर हे बोर्ली पंचतन व परिसरातील गणेश भंक्तांचे श्रद्धास्थान आहे, या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा मानस मंदिर संस्थेचे पदाधिकारी यांचा होता तसेच गावामध्ये असणारे तलाव यांचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत ग्रामपंचायत यांनी खासदार सुनील तटकरे, जिल्ह्याच्या पालकमंत्री ना आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांचे कडे याबाबत निवेदन दिले होते यावर शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजन २०२१/२२ अंतर्गत बोर्ली पंचतन येथील पुरातन गणेश मंदिर सभागृह बांधकाम करणे साठी सुमारे ६७ लक्ष रुपये निधी तर बोर्ली पंचतन एस टी स्टँड जवळील तलाव सुशोभीकरण करणेसाठी ०१ कोटी रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे मंजुरीचे पत्र खासदार सुनील तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते सुतारवाडी येथे गणपती देवस्थान संस्था अध्यक्ष सुशील पाटील व चिंचबादेवी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष सुजित पाटील यांचे कडे सुपूर्द करण्यात आले यावेळी महमद मेमन, चिंचबादेवी देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष विजय मोरे, खजिनदार शंकर गाणेकर, गणपती देवस्थान संस्था उपाध्यक्ष वैभव कदम, सचिव समीर पाटील, खजिनदार मंगेश पाटील, सदस्य अनंत रातोडकर, गजानन कांबळे, आगरी समाज अध्यक्ष चंद्रकांत धनावडे, सचिव प्रशांत पाटील, महेंद्र पाटील, माजी अध्यक्ष विष्णू धुमाळ, माजी उपसरपंच मन्सूर गिरे, राष्ट्रवादी काँग्रेस बोर्लीपंचतन शहराध्यक्ष संतोष गायकर व इतर उपस्थिती होते.
तसेच खासदार सुनील तटकरे यांनी आदर्श सांसद ग्राम योजनेतून दत्तक घेतलेल्या वडवली गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी ८० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला असून त्या मंजुरीचे पत्र सरपंच प्रियांका नाक्ती, सदस्य सुचिन किर यांचे कडे सुपूर्द करण्यात आला. बोर्ली पंचतन गावासाठी एकूण ०१ कोटी ६७ लक्ष रुपये तर वडवली गावातील अंतर्गत रस्त्यासाठी ८० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार सुनील तटकरे , पालकमंत्री ना. आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांना बोर्ली करांनी धन्यवाद दिले.