Type Here to Get Search Results !

पोलादपूर तालुक्यातील लोहारे गावात मोफत नेत्रचिकित्सा व आरोग्याबद्दल जनजागृती


पोलादपूर तालुक्यातील लोहारे गावात मोफत नेत्रचिकित्सा व आरोग्याबद्दल जनजागृती


रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर


        नागरिकांमध्ये आरोग्याबद्दल जनजागृती व्हावी व गरीब व गरजू लोकांचा मोफत उपचार व्हावेत यासाठी पोलादपूर तालुक्यातील गावांमध्ये  स्त्रीरोग, बालरोग, दंतचिकित्सा, नेत्रचिकित्सा, कर्करोग अशा वेगवेगळ्या आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते. 
        रविवार दिनांक २४ एप्रिल रोजी लोहारे गावात नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले व तसेच नेत्रदानाचे महत्त्व समजावण्यात आले मागील दोन वर्ष कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे कोणत्याही प्रकारचे आरोग्य शिबीर राबवणे शक्य नव्हते. त्यामुळे लोकांच्या अनेक आरोग्य संबंधी समस्या होत्या त्यामुळे पोलादपूर तालुक्यातील लोहारे गावात आर  झुनझुनवाला हॉस्पिटल व ग्रामपंचायत लोहारे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेमध्ये मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले असून गरीब व गरजू लोकांच्या डोळ्यांची तपासणी करून जर कोणी कोणत्याही प्रकारच्या डोळ्यात समस्या आजार असल्यास संबंधी आजार असल्यास त्यांना पनवेलमधील रुग्णालयात त्यांचे मोफत उपचार व मोफत रुग्णवाहिकेचे सहित त्यांचा सर्व खर्च संबंधित ट्रस्ट करणार आहे.


      शिबिरासाठी लोहारे ग्रामपंचायत सरपंच शिवराम पवार, आशा सेविका तसेच झुनझुनवाला हॉस्पिटल येथील डॉक्टर व आरोग्य सेविका यांच्या साह्याने नागरिकांचे मोफत उपचार करण्यात येणार आहेत. लोहारे गावातील तसेच पोलादपूर तालुक्यातील अनेक खेडे गावांमधून देखील या शिबिरासाठी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते व तसेच पुढील उपचारासाठी नोंदणी देखील करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test