Type Here to Get Search Results !

पहिला मराठी इंडियन आयडल सागर म्हात्रेचा उरण मध्ये स्वागत व सत्कार


पहिला मराठी इंडियन आयडल सागर म्हात्रेचा उरण मध्ये स्वागत व सत्कार


रायगड वेध विठ्ठल ममताबादे उरण


गेल्या अनेक महिन्यापासून समस्त उरणकरांना पहिला मराठी इंडियन आयडल कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. ती उत्सुकता 20/4/2022 रोजी लागलेल्या निकालाने संपली असून सोनी मराठी चॅनेल पुरस्कृत इंडियन आयडल मराठी या स्पर्धेत उरण तालुक्यातील कोप्रोली गावचे सुपुत्र सागर विश्वास म्हात्रे हे प्रथम आल्याने ते पहिले मराठी इंडियन आयडल ठरले आहेत.

पेशाने ऑटोमोबाईल इंजिनिअर असलेले सागर विश्वास म्हात्रे हे उत्तम गायक देखील आहेत. त्यांनी नोव्हेंबर महिन्यात मराठी इंडियन आयडल या सोनी मराठी चॅनेल पुरस्कृत स्पर्धेत सहभाग घेतला प्रत्येक स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी प्रेषकांना चाहत्यांना ऑनलाईन मते देण्याविषयी(व्होटिंग करण्याविषयी)विनंती केली होती.

 सागरचे अथक परिश्रम व इतर सर्वांचे आशीर्वाद प्रेम व केलल्या ऑनलाइन वोटिंग मुळे सागर सदर स्पर्धेत पहिला मराठी इंडियन आयडल ठरला आहे. दिनांक 20/4/2022 रोजी सोनी मराठी चॅनेलच्या माध्यमातून ही अंतिम स्पर्धा मीरा-भाईंदर, मुंबई येथील स्टुडिओत संपन्न झाली. रात्री 10 वाजता प्रसिद्ध गायक अजय अतुल यांनी सागर म्हात्रेचा सत्कार करत सागर म्हात्रेला पहिला मराठी इंडियन आयडल घोषित केले.


 सागर विश्वास म्हात्रे पहिला मराठी इंडियन आयडल ठरल्याने मुंबई,नवी मुंबई,ठाणे, पालघर जिल्हा, रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी एकच जल्लोष केला. प्रत्येक नागरिकांनी आनंद व्यक्त करत फटाके फोडून पेढे वाटून आनंद व्यक्त केला. उरण तालुक्यातील कोप्रोली गावाचा सुपुत्र असल्याने उरण तालुक्यातील पूर्व विभागात 21/4/2022 रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले. उरणमध्ये आल्यावर सागर ने सर्वप्रथम जासई मधील लोकनेते माजी खासदार दि बा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हार घालून त्यांना वंदन केले. तद नंतर कोप्रोली या त्याच्या गावात सागर पोहोचला.तेथून सागरच्या विजयाचा जल्लोष करत बेंजो व लेझिमच्या तालावर भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आली. खोपटे, पाणदिवे, पिरकोन, पाले गोवठणे, आवरे,सारडे,वशेणी,पुनाडे, केळवणे, चिरनेर, कळंबूसरे, मोठी जुई आदी गावात रॅली निघाली.

 गावात प्रत्येक ठिकाणी सागर म्हात्रेचे औक्षण करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.अनेक नागरिकांनी सागर म्हात्रेला व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आदी सोशल मीडिया द्वारे हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. उरण तालुक्यासह रायगड जिल्ह्याचे नाव अजरामर केल्याने सर्व स्तरातून सागर म्हात्रे यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 सागर म्हात्रेचे आई पंकजा म्हात्रे,वडील विश्वास म्हात्रे यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. सागर म्हात्रेचे सुरवातीचे गुरु संध्या घाडगे, महादेव बुवा शहाबाजकर यानंतर गेली अनेक वर्षे मार्गदर्शन केले ते गुरुवर्य कोल्हापुरे सर आदींचे यात महत्त्वाचे योगदान आहे. सागरला जिंकण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील विविध नागरिक, सामाजिक संस्था,संघटना, चाहते विविध सेलिब्रीटी यांनी तसेच स्थानिक भूमिपुत्रांनी मोठ्या प्रमाणात वोटिंग केले त्यामुळे सागर म्हात्रे याचा यशाचा मार्ग मोकळा झाला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test