"आता आपल्याला लक्षात येईल की भारत जगात सर्वाधिक दुचाकी का बनवतो. आम्ही टू-व्हिलरची इंच इंच जागा कशी जास्तीत जास्त उपयोगात आणायची आणि जास्त माल कसा न्यायचा याची आम्हाला चांगली माहिती आहे. आम्ही असेच आहोत", असं आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये नमदू केलं आहे
यूझर्सचा इंटरेस्टिंग रिप्लाय
महिंद्राच्या या पोस्टवर एका यूजरनं म्हटलं की, "त्यानं (बाईक चालक) दोन्ही खुर्च्यांचा वरचा भाग रिकामा का ठेवला?". तर आणखी एका युझरनं परेड दरम्यान मोटारसायकलवर अप्रतिम कामगिरी करत असलेल्या जवानांचं छायाचित्र पोस्ट केलं आणि लिहिलं, "हे अतुल्य भारताचे सौंदर्य किंवा प्रतिभा आहे सर..."