दिवेआगर ग्रामपंचायतीकडून सर्व स्थानिक कुटुंबीयाना घमेले, फावडे चे वाटप
रायगड वेध वैभव तोडणकर आदगाव
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर ग्रामपंचायतीकडील ग्रामनिधीतून दिवेआगर ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक कुटुंबाला घमेले,फावडे चे वाटप करण्यात आले.
दिवेआगर ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून दिवेआगर च्या प्रत्येक कुटुंबाला घमेले,फावडे अशी शेतीपयोगी अवजारे वाटण्यात आली. अंदाजे १२०० कुटुंबांना या घमेले व फावडे वाटण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने दिवेआगर ग्रामपंचायत कार्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात काहि ग्रामस्थांना या अवजारांचे वाटप करण्यात आले.
यावेळी दिवेआगर सरपंच उदय बापट, उपसरपंच सिद्धी कोसबे, सुहास मार्कंडे, तृप्ती सदानंद चोगले, गीता वाणी, प्रकाश दातार, सिद्धेश कोसबे,भाई शिलधनकर,रत्नाकर शिलकर,अविनाश राऊळ,मयूर पाते, मिलिंद भगत, गणेश चोगले, दिलीप वाणी, सुयोग वाणी,गजानन चोगले, देवेंद्र नार्वेकर, ग्रामसेवक शंकर मयेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.