Type Here to Get Search Results !

दिवेआगर ग्रामपंचायतीकडून २९ दिव्यांगाना धनादेशाचे वाटप.


दिवेआगर ग्रामपंचायतीकडून २९ दिव्यांगाना धनादेशाचे वाटप.

रायगड वेध वैभव तोडणकर आदगाव


श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर ग्रामपंचायतीकडून ५% दिव्यांग अर्थसहाय्य निधी तरतुदीतून दिवेआगर गावातील २९ दिव्यांगांना प्रत्येकी रुपये ४९०४ इतक्या रकमेच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
दिवेआगर ग्रामपंचायतीकडून दरवर्षी दिव्यांगांना ५% दिव्यांग अर्थसहाय्य निधी तरतुदीतून भेटवस्तू वा आर्थिक स्वरूपात मदत देण्यात येते त्यानुसार दि.२५ एप्रिल ला दिवेआगर ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात दिवेआगर गावातील २९ दिव्यांगांना प्रत्येकी रुपये चार हजार नऊशे चार इतक्या रकमेच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात सरपंच उदय बापट व उपसरपंच सिद्धी सिद्धेश कोसबे,दिवेआगर ग्रामपंचायत गामसेवक शंकर मयेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश दातार, राकेश केळसकर, सुहास मार्कंडे, तृप्ती चोगले यांच्याहस्ते २९ दिव्यांगांना धनादेश देण्यात आले. मागील वर्षी १४ व्या वित्त आयोगानुसार प्रत्येक दिव्यांगाला फ्रीजचे वाटप करण्यात आले होते. ग्रामपंचायतीकडून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे श्रीवर्धन तालुक्यातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test