Type Here to Get Search Results !

तळा ते म्हसळा एसटी सेवा सुरू करण्याची मागणी


तळा ते म्हसळा एसटी सेवा सुरू करण्याची मागणी


रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा


 तळा बसस्थानकातून तळा ते म्हसळा एसटी सेवा सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून तळा बसस्थानकातून तळा ते म्हसळा एसटीची वाहतूक सुरू होती.सकाळी १०.१५ व दुपारी ३.३० अशा एसटीच्या दोन फेऱ्या बसस्थानकातून सुरू होत्या.नोकरी निमित्त,तसेच खाजगी कामासाठी म्हसळा तालुक्यात जाण्याऱ्या नागरिकांसाठी या एसटीचा मोठा आधार होता.तसेच पिटसई,मांदाड,कुडा रोवळा,वाशी आदि गावातील नागरिक या गाडीने प्रवास करीत असत.त्यामुळे येता जाता ही बस प्रवाशांनी पूर्णपणे भरलेली असे. व या दोन फेऱ्यांमधून एसटी महामंडळाला चांगला नफा देखील मिळत होता.काही महिन्यांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे तळा ते म्हसळा ही एसटी फेरी बंद पडली. ती आजतागायत सुरू करण्यात आलेली नाही. एसटीचा संप मिटल्यानंतर तळा बसस्थानकातून बहुतांश एसटीच्या फेऱ्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. मात्र नेहमी नफा मिळवून देणारी तळा ते म्हसळा एसटी अद्यापही सुरू करण्यात आली नसल्याने प्रवासी वर्गामधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यामुळे उन्हाळी सुट्टी साठी मोठ्या प्रमाणावर मुंबईतील चाकरमानी गावाला परतत असतात.अशावेळी त्यांच्या प्रवासाची गैरसोय होऊ नये यासाठी तळा ते म्हसळा एसटी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test