• पेण तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिक बेहाल
• नागरिकांकडून थंड पेय,छत्री,स्कार्फ,वातानुकूलित
यंत्राचा वापर
रायगड वेध प्रशांत पोतदार पेण
पेण तालुक्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने नगारिक गरमने बेहाल झाले आहे. सकाळ ते दुपार दरम्यान कमाल ३६ ते ४० डीग्री सेल्सियस पर्यंत उष्णतेचा पारा चढता असल्याने अंगाची लाही लाही करणारा ठरत आहे तर एप्रिल महिन्यात वातावरणातील तापमानात प्रचंड वाढ होत असल्याने नागरीकांना कामा निमित्त घरा बाहेर पडणे ही जिकिरीचे झाले आहे.
लहान मुले तसेच वयोवृद्ध व्यक्तींनी तापमानात वाढ झाल्याने काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.
सकाळी घरातुन कामा निमित्त बाहेर पडणारे नागरीक उष्णतेच्या काहली पासुन स्वतःला थंडावा मिळावा म्हणून ठंडा ठंडा कूल कूल करणाऱ्या थंड पेयांकडे वळत आहेत.
यामध्ये ऊसाचा रस,कलिंगड आदी ज्यूस,लिंबू सरबत, आवळा सरबत,कोकम सरबतल,आईस्क्रिम आदी दुकानावर नागरीक दिसू लागले आहेत तसेच उष्णते पासुन संरक्षन करण्यासाठी नागरिक छत्री,स्कार्फ,टोपी तर घराबाहेर न पडणारे नागरिक फॅन,कुलर, एसी अशा वातानुकूलित यंत्रांचा वापर करताना दिसत आहेत.