Type Here to Get Search Results !

बोरगाव येथील कालव्यात सापडलेल्या मृतदेह प्रकरणी पेण पोलिस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल


• बोरगाव येथील कालव्यात सापडलेल्या मृतदेह प्रकरणी पेण पोलिस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल 


रायगड वेध प्रशांत पोतदार पेण


पेणमध्ये आठवढाभरात तीन मृतदेह सापडले असल्याने चोऱ्यांच्या प्रकारानंतर मृतदेहांचे प्रकार घडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेआहे. 

पेणमध्ये पकडण्यात आलेली कोट्यवधी रुपयांची व्हेल माशाची उलटी,पकडण्यात आलेला गांजा,रात्री अपरात्री फिरणारे गर्दुल्ले या अशा प्रकारांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले असतानाच आता आठवडाभरात पशुसंवर्धन कार्यालय,आंबामाता मंदिरा जवळ मृतदेह सापडले आहेत. 

शुक्रवारी बोरगाव कालव्यात एक मृतदेह सापडला असून पांडुरंग भडकले वय ५० वर्षे रा.बोरगाव त्याच्या शरीरावर जख्मा असल्याचे समजते त्यामुळे हा घात की अपघात याची शहरात चर्चा होत आहे.या बाबात पेण पोलिस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरिक्षक देवेंद्र पोळ हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test