Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मागील निवडणुकीचा वचपा सर्वांनी काढावा - आ. अनिकेत तटकरे


• जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मागील निवडणुकीचा वचपा सर्वांनी काढावा - आ. अनिकेत तटकरे

• सव्वा दोन कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करून नागोठणे विभागात घडला इतिहास

• राष्ट्रवादी काय करु शकते हे या कार्यक्रमांनी दाखवून दिले - आ. अनिकेत तटकरे 


रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


नागोठणे विभागांतील जनतेशी असणार्या ऋणानुबंधामुळे खासदार तटकरे साहेबांनी नागोठणे भागातील विकासकामांना नेहमीच झुकते माप दिले आहे. साहेब व आदीतीताई निधी उपलब्ध करून देण्यात किती कार्यतत्पर आहेत ते आज ११ ठिकाणी झालेल्या सुमारे ५० विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पणातून दिसून आल्याने हा एक वेगळा इतिहास नागोठणे भागात घडला आहे. याचे सर्वस्वी श्रेय साहेब व ताईंच्या नेतृत्वाला आहे याचे समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असून राष्ट्रवादी पक्ष काय करू शकतो हे आजच्या सर्वच कार्यक्रमांनी दिसून आले आहे. त्यामुळेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मागील निवडणुकीतील पराभवाचा वचपा सर्वांनी काढावा असा एनर्जीयुक्त डोस तरुण तडफदार व दमदार आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. याचबरोबर आ. अनिकेतभाई तटकरे यांनी कडसुरे गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते व निवृत्त शिक्षक महादेव शिर्के गुरुजी यांच्या तब्बेतीची चौकशी भाई टके यांच्याकडे केली व तटकरे कुटुंबीय कौटुंबिक नाते टिकविण्याचे काम नेहमीच करते असे सांगितले.  
खा. सुनील तटकरे, ना. आदितीताई तटकरे व आ. अनिकेतभाई तटकरे यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या नागोठणे विभागातील २.२५ कोटी रुपयांच्या विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आ. अनिकेतभाई तटकरे यांच्या हस्ते शुक्रवारी(दि.२२) संपूर्ण दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाल्यानंतर याचा समारोप कडसुरे येथील सभागृहात करण्यात आला त्यावेळी आ. तटकरे बोलत होते. दरम्यान तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमांत वांगणी-आमडोशीत राष्ट्रवादी युवकचे विभागीय अध्यक्ष प्रमोद जांबेकर, चिकणी येथे राष्ट्रवादीचे विभागीय कार्याध्यक्ष सचिन कळसकर, पळस येथे विभागीय नेते शिवरामभाऊ शिंदे, वणी येथे सरपंच प्रगती आवाद, आंबेघर येथे सरपंच व विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी तर कडसुरे येथे सरपंच राजेंद्र शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकांतून खा. सुनील तटकरे, पालकमंत्री आदितीताई तटकरे व आ. अनिकेतभाई तटकरे यांनी दिलेल्या कोट्यावधीच्या भरघोस निधीची माहिती देत भविष्यातील विकासकामांची यादी सादर केली. दरम्यान चिकणी येथील कार्यक्रमात गावाचे सुपुत्र व सचिन कळसकर यांचे मेहुणे उदय देवरे यांनी मिस्टर युनिव्हर्स ७० किलो गटात सुवर्णपदक मिळविल्याबद्दल आ. अनिकेतभाई यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमांना राष्ट्रवादीचे विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, मधुकर ठमके, विलास चौलकर, विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी, नागोठणे शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, सचिन कळसकर, प्रमोद जांबेकर, दीपेंद्र आवाद, विनायक गोळे, राकेश शिंदे, दळवी गुरुजी, तानाजी लाड, महिला आघाडीच्या प्रीतमताई पाटील, आशा शिर्के, सुजाता जवके, अमिता शिंदे, सखुबाई पिंगळा, प्रतिभा तेरडे, निष्ठा विचारे, पळसच्या सरपंच परीक्षा घासे, उपसरपंच चंद्रकांत भालेकर, कडसुरे सरपंच राजेंद्र शिंदे, वणी सरपंच प्रगती आवाद, उपसरपंच महेंद्र हंबीर, दत्तात्रेय शिर्के, कृष्णा धामणे, सुधाकर पारंगे, पांडुरंग गायकर, हिराजी शिंदे, एकनाथ ठाकूर, शेखर ठाकूर, निवास पवार, नाना बडे, अतुल काळे, राजेश पिंपळे, दिलनवाज अधिकारी, मेघना कोळी, सुनील लाड, प्रकाश मोरे, मंगेश तेरडे, किसन बोरकर, रोहिदास हातनोलकर, मनोज टके, दिनेश घाग, चेतन टके, कुणाल तेरडे, प्रथमेश काळे, सिद्धेश काळे, केतन भोय, झिमा कोकरे, सचिन जोशी, किशोर कदम, प्रकाश रेवाळे, बाळा वाजे, अक्षय नागोठणेकर आदींसह कार्यकर्ते यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.  

भूमिपूजन व लोकार्पण झालेल्या विकासकामांत वांगणी-आमडोशी (३५ लाख), वजरोली-चिकणी(१९ लाख), वासगांव-लाव्हेची वाडी (१३ लाख), पळस-शेतपळस(२३ लाख), नागोठणे(२० लाख), वणी ग्रामपंचायत (९० लाख), वेलशेत-आंबेघर (८ लाख) आदी गावांतील मंदिर, स्मशानभूमीकडे जाणारे व अंतर्गत असे पेव्हर ब्लाॅक व सिमेंट काँक्रीट रस्ते, जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना, समाजमंदिर, व्यायामशाळा, अंगणवाडी इमारत, स्मशानभूमी, दशक्रिया विधी शेड, मंदिर शुशोभिकरण, मंदिर सामाजिक सभागृह, बस थांबे अशा विविध सव्वादोन कोटी रूपयांच्या विकास कामांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test