• वेळास ग्रामपंचायत स्थरीय १५ वा वित्तआयोगा अंतर्गत फारशी ते दळवी वाडीला जोडणाऱ्या रस्ताचे भूमीपुजन
• यात्रा स्थळ विकास अंतर्गत सौरऊर्जे वर चालणारे पाच पथदिवे कार्यान्वित
रायगड वेध संतोष शिलकर वेळास आगर
श्रीवर्धन तालुक्यातील मौजे-वेळास ग्रामपंचायत स्तरीय १५ वा वित्त आयोगाच्या माध्यमातून वेळास फारशी ते दळवी वाडीला जोडणारा १०० मीटरचा रस्ता काँक्रेटीकरण कामाचे भूमिपूजन वेळास ग्रा.पं.सरपंच आशुतोष अंकुश पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.या वेळी माजी तंटा-मुक्ती अध्यक्ष किसन रहाटे,माजी उप-सरपंच सुरेश धोपट,सामाजिक कार्यकर्ते सचिन दळवी,बंदू दळवी,जेष्ठ नागरीक धोंडू दळवी, विनायक लाड, शशिकांत पवार, शैलेश जाधव, रामदास मोरे हे ग्रामस्थ उपस्थित होते.या अगोदर पनवेल येथील आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्ना मुळे व वेळास ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच व श्रीवर्धन भाजप सरचिटणीस आशुतोष अंकुश पाटील यांच्या मागणी व पाठपुराव्याने वेळास आगर येथे यात्रा स्थळ विकास योजने अंतर्गत वेळास आगर समुद्र किनाऱ्या लगतच्या रस्त्यावर सोलर वरील स्ट्रीट लाईट बसविण्यात आले आहेत. या कामाचा शुभारंभ नुकताच झाला असून वेळास आगरला सुंदर समुद्र किनारा लाभलेल्या बीचवर या लाईट बसविण्यात आल्या आहेत.रात्रीच्या वेळी थोडी कुटुंबासह विश्रांती घ्यावी वाटल्यास अशा लक्ख प्रकाशात या सुंदर आणि स्वच्छ किनाऱ्यावर बसून निसर्गाचा आस्वाद घेता येईल.गावाच्या लगत असलेल्या या सुंदर बीचवर अशा विविध सुविधा उपलब्ध करुन पर्यटकांचा लक्ष वेधून इथे पर्यटक कसे स्थिरावतील ते कसे रमतील याकडे लक्ष द्यायला पाहिजे.यासाठी या किनाऱ्याची स्वच्छता राखणे गरजेचे आहे.
वेळास हे पर्यटन स्थळ व्हावं अशी मागणी बहुतांशी ग्रामस्थांकडून होत आहे.या करीता ग्रामपंचायती मार्फत पाठपुरावा व्हायला हवा.तसे झाल्यास मौजे-वेळास हे गांव पर्यटन स्थळ व्हायला वेळ लागणार नाही."क"दर्जाचं पर्यटन स्थळ नकाशावर आल्यास इथे बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे.
या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आशुतोष पाटील यांची काही ना काही कार्य करण्याची सतत धडपड चालू असते.केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या योजना असोत त्या लाभार्थ्यांच्या पर्यंत पोहचविण्याचं काम सुरू असतं.तसेच ग्रामपंचायत सदस्य धवल तवसाळकर यांचंही सामाजिक कार्यात खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे.याच किनारपट्टीवर स्वच्छतेला आवश्य असणाऱ्या डस्टबिन बकेटची व्यवस्था त्यांनी केली होती.शिवाय उप-सरपंच दिपक दर्गे, सुरेश मुंडेकर, मानसी निगडे, मनाली मयेकर, सौ.संपदा घोले, वसुधा वाजे अशा सात सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीने समाजोपयोगी कामं करत असतांना मौजे- वेळास हे पर्यटन स्थळ व्हावं या मागणीकडे लक्ष द्यावे अशी ग्रामस्थांची विनंती आहे.